पक्ष संघटनेतील बदलासाठी संदीप देशपांडेंची राज ठाकरेंना साद

मनसेतील पराभवाच्या तूतू मैमै वादात आता युवा फळीतल्या नेत्यांचीही उडी

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 22, 2017 12:55 PM IST

पक्ष संघटनेतील बदलासाठी संदीप देशपांडेंची राज ठाकरेंना साद

सुवर्णा दुसाने,  मुंबई

21 एप्रिल :  मनसेतील पराभवाच्या तू-तू-मै-मै वादातला ट्विटर अंकही आता समोर आला आहे. पक्षाचे युवा नेते संदीप देशपांडे यांनी थेट ट्विटरवरूनच राज ठाकरेंनी संघटनात्मक बदलाची मागणी केली आहे. त्यांचा रोख विशेषत: दुसऱ्या फळीतल्या नेत्यांवर दिसतोय. त्यामुळे मनसेमध्ये नेमकं कोण कोणाला बदलणार, हा मुद्दा पुन्हा चर्चेला आला आहे.

मनसेच्या पराभवाचं कवित्व काही केल्या संपायचं नावं घेत नाही. पक्षाच्या पराभवाचं खापर कोणाच्या डोक्यावर फोडायचं यावरून स्वत: राज ठाकरे आणि मनसे नेत्यांमध्ये वाद झाल्यानंतर आता पक्षाचे युवा नेतेही दुसऱ्या फळीतल्या नेत्यांविरोधात उघडपणे बोलू लागले आहेत. संदीप देशपांडेनं तर थेट तशा आशयाचं ट्विटच केलं आहे.

या ट्विटमध्ये संदीप देशपांडे म्हणतात,  

विशेष म्हणजे, याच आशयाचं ट्विट अमेय खोपकर यांनीही केलं होतं. पण नंतर त्यांनी स्वतःच डिलीट करून टाकलं.

असो, पण यानिमित्ताने मनसेतील दुसऱ्या फळीतले नेते आणि युवा नेते यांच्यातलाही वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. पक्षातल्या युवा नेत्यांनी थेट ट्विटरवरूनच पक्षातल्या नेतेमंडळींना बदलण्याची अप्रत्यक्ष मागणी राज ठाकरेंकडे केली आहे. विशेष म्हणजे चिंतन बैठकीतल्या वादाला 24 उलटत नाहीत, तोच पक्षातला हा नवा उफाळून आला आहे. त्यामुळे, राज ठाकरे यांच्या मर्जीतील मानले जाणारे देशपांडे आणि खोपकर यांनी ट्विट केल्याने या ट्विट्सला निश्चितच वेगळं महत्वं आहे. आता युवा नेत्यांच्या या संघटनात्मक फेरबदलाच्या मागणीला कसा प्रतिसाद देतात याकडेच सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान, मनसेतील दुसऱ्या फळीतील काही नेते शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्याही बातम्या अधूनमधून येत असतात, आणि याच नेत्यांनी पक्ष बैठकीत पराभवाचं खापर राज ठाकरेंवर फोडण्याचा प्रयत्न केला होता. म्हणूनच, त्याला प्रतिवाद म्हणून हे मनसेतलं ट्विटर वॉर पेटल्याचं बोललं जातं आहे. पण या सगळ्या कुरघोडीत मनसेचं उरलंसुरलं अस्तित्व देखील संपून जाईल, याचंही भान पक्षाध्यक्षांपासून ते नेत्यांपर्यंत कोणालाच आल्याचं अजूनही दिसत नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 22, 2017 12:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...