पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताचे नवे हिटलर, मनसेच्या 'या' नेत्याचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी नव्या भारताचे नवे हिटलर, मनसेच्या 'या' नेत्याचा आरोप

मोदी सरकार सूडबुद्धीने वागत आहेत. तसेच नव्या भारताचे नवे हिटलर जर कोणी असेल, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी आरोप केला आहे.

  • Share this:

मुंबई, 20 ऑगस्ट- कोहिनूर स्क्वेअर प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांना अंमलबजावणी संचालनालने (ED) नोटीस बजावली आहे. 22 ऑगस्टला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेशही राज ठाकरे यांनी देण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. मोदी सरकार सूडबुद्धीने वागत आहेत. तसेच नव्या भारताचे नवे हिटलर जर कोणी असेल, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी आरोप केला आहे.

सीबीआय, ईडी हे सगळे भाजपचे कार्यकर्ते...

राज ठाकरे यांनी ईव्हीएमविरोधात दंड थोपटले आहे. ते आंदोलन उभे करण्याचा प्रयत्नात आहेत. याचीच भाजपला भीती आहे. मागील पाच वर्षांत कोणत्या भाजप नेत्याची सीबीआय, ईडी चौकशी झाली का? हे सरकार सूडबुद्धीने सारं काही करत आहे, असा घणाघात संदीप देशपांडेंनी केला आहे. भाजप दबावतंत्राचा वापर करत आहे. जो कोणी भाजप विरोधात बोलेल त्याच्याविरोधात अशा प्रकारच्या चौकशा लावल्या जात आहे. सीबीआय, ईडी हे सगळे भाजपचे कार्यकर्ते झाले आहेत. मात्र, या कार्यकर्त्यांशी कसं डील करायचं, हे मनसेला चांगल्याप्रकारे माहीत आहे. मनसे कोणत्याही चौकशीला घाबरत नाही, आम्ही आमचं आंदोलन सुरुच ठेवू, आता तर अधिक तीव्र करु, असा इशाराही संदीप देशपांडेंनी दिला.

यामुळे राज ठाकरे ईडीच्या रडारवर..

राज ठाकरे यांना मिळालेल्या ईडीच्या नोटीशीनंतर राजकारण तापायला सुरुवात झालीय. मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. येत्या 22 तारखेला राज ठाकरेंना चौकशीला हजर राहावं लागणार आहे. यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याचा मनसेचा प्रयत्न आहे. राज्यभरातून मनसैनिक मुंबईत दाखल होणार असून दादर ते ईडी ऑफिस असा लाँग मार्च ते काढणार असल्याची माहिती मनसेकडून देण्यात येतेय. याच दिवशी मनसे आपली ताकद दाखवून देण्यासाठी कामाला लागली असून राजकीय संघर्ष तापविण्याचे प्रयत्न करण्यात येणार आहेत. दरम्यान, व्यावसायिक आणि मनोहर जोशी यांचे पुत्र उन्मेश जोशी यांचीही याच प्रकरणात ईडीने चौकशी केली. ही चौकशी तब्बल आठ तास चालली. चौकशीसाठी पूर्ण सहकार्य केलं असून आणखी चौकशी होणार असल्याचं उन्मेश जोशी यांनी सांगितलं.

राज ठाकरेंवरची 'ईडी'ची पीडा टाळण्यासाठी मनसैनिक देणार साहेबांची साथ!

राज यांना चौकशीसाठी बोलावल्यास मनसे ठाणे बंद करेल असा इशाराही देण्यात आला होता. लोकांनी त्या दिवशी प्रेमाने बंद ठेवला तर चांगलं आहे, नाही तर कार्यकर्त्यांच्या रोषाला समोरं जावं लागेल असा इशारा मनसेचे ठाणे, पालघर जिल्हाअध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिला होता. महाराष्ट्रात त्या दिवशी जे घडेल त्याला शासन व सरकार जवाबदार असेल असंही ते म्हणाले होते. राज ठाकरे यांना ईडी ची नोटिस म्हणजे ईव्हीएम ला विरोध केल्याचा राग आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं होतं. मात्र पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांनी बंद नको असा निर्णय घेतल्याने हा बंद मागे घेण्यात आला.

देशभरात विविध यंत्रणांचा वापर करून विरोधकांना दाबण्याचा मोदी सरकारचा प्रकार सुरु आहे. ईडी किंवा सीबीआय असेल याचा दुरुपयोग कसा करायचा हे सरकारने दाखवून दिले आहे असा आरोपही नवाब मलिक यांनी केला. मागील लोकसभा निवडणुकीत, राज ठाकरे यांनी सरकारच्या विरोधात काही प्रश्न निर्माण केले, ते भूमिका मांडतात त्यामुळे त्यांच्या मनात भिती निर्माण व्हावी म्हणून ही नोटीस राज ठाकरे यांना बजावण्यात आल्याचा आरोपही नवाब मलिक यांनी केलाय.

SPECIAL REPORT : निवडणुकीआधीच सेनेला झटका, करमाळ्याच्या राजकारणाने बदलले वारे!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 20, 2019 02:38 PM IST

ताज्या बातम्या