राज ठाकरेंच्या घरासमोर मनसैनिकांची गद्दारांविरोधात घोषणाबाजी

बीएमसीतील मनसेच्या 6 नगरसेवकांनी राज ठाकरेंची साथ सोडल्यानंतर त्यांना आधार देण्यासाठी शेकडो मनसैनिक आज सकाळपासूनच राज ठाकरेंच्या घराबाहेर गोळा झालेत. नगरसेवक गद्दार झाले तर होऊ द्या, आम्ही मात्र, तुमच्यासोबतच आहोत, हे दाखवून देण्यासाठीच आम्ही इथं आल्याचं या मनसैनिकांनी सांगितलं

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Oct 14, 2017 02:09 PM IST

राज ठाकरेंच्या घरासमोर मनसैनिकांची गद्दारांविरोधात घोषणाबाजी

मुंबई, 14 ऑक्टोबर : बीएमसीतील मनसेच्या 6 नगरसेवकांनी राज ठाकरेंची साथ सोडल्यानंतर त्यांना आधार देण्यासाठी शेकडो मनसैनिक आज सकाळपासूनच राज ठाकरेंच्या घराबाहेर गोळा झालेत. नगरसेवक गद्दार झाले तर होऊ द्या, आम्ही मात्र, तुमच्यासोबतच आहोत, हे दाखवून देण्यासाठीच आम्ही इथं आल्याचं या मनसैनिकांनी सांगितलं, या निष्ठावान मनसैनिकांकडून मनसेतून फुटून बाहेर पडलेल्या नगरसेवकांना शिव्याही घातल्या जात आहेत. उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या नावानेही हे मनसैनिक लाखोळ्या वाहताहेत.

खरंतर कालपासूनच हे निष्ठावान कार्यकर्ते राज ठाकरेंना भेटण्यासाठी प्रयत्न करताहेत. किंबहुना त्यासाठीच आज ते राजगड या राज ठाकरेंच्या घराबाहेर जमा झालेत. राज ठाकरेंनीही बाराच्या सुमारास या निष्ठावान मनसैनिकांना भेट देऊन शांत राहण्याचं आवाहन केलं. दरम्यान, रात्री शिवसेनेत प्रवेश केलेल्या मनसेच्या 6 नगरसवेकांवर मनसैनिकांकडून हल्ला होण्याची शक्यता गृहित धरून शिवसेनेनं रात्रीच त्यांना अज्ञातस्थळी हलवलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 14, 2017 01:00 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...