मनसेचा अंतर्गत वाद चव्हाट्यावर, अधिवेशनाच्या तयारी बैठकीत भिडले नेते

मुंबईतल्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांसमोर हा प्रकार घडला मनसेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जानेवारी : मनसेच्या महाअधिवेशनाच्या तयारीच्या बैठकीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांमध्ये शाब्दिक राडा झाल्याची माहिती समोर येत आहे. पक्षाचे नेते बाळा नांदगावकर आणि सरचिटणीस-मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष आदित्य शिरोडकर यांच्यात शाब्दिक वाद झाले आहेत. मुंबईतल्या सर्व पदाधिकारी आणि नेत्यांसमोर हा प्रकार घडला मनसेचे अंतर्गत वाद चव्हाट्यावर आल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

पक्षाचे कार्यालय 'राजगड' इथं ही बैठक आयोजित करण्यात आली होती. बाळा नांदगावकर यांनी नुकत्याच एका प्रसारमाध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत व्यक्त केलेल्या मतांनी पक्षात अनेक नेते-पदाधिकारी नाराज होते. या नाराजीवरून बैठकीत वाद झाल्याचं समोर येत आहे. 'गेल्या तेरा वर्षात पक्ष वाढीसाठी आम्ही नेते कमी पडलो. तसंच पक्षाच्या महिला, विद्यार्थी आणि कामगार संघटनाही कमी पडल्या' असं वक्तव्य बाळा नांदगावकर यांनी मुलाखतीत केलं होतं. त्यावरून पक्षामध्ये नाराजी आहे.

या सगळ्यावरच विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष असलेले आदित्य शिरोडकर नाराज झालेत होते. त्यामुळे त्यांनी आज बैठकीत आतापर्यंत केलेल्या कामाचा पाढाच वाचून दाखवला. आदित्य शिरोडकरांच्या या बैठकीत नांदगावकर यांच्याशी खटके उडाले. पदाधिकाऱ्यांसमोर सुरू असलेलं नांदगावकर-शिरोडकर यांच्यातील भांडण सोडवण्यासाठी अखेर पक्षातील अन्य नेत्यांना मध्यस्थी करावी लागली.

#BREAKING NEWS : तारापूर MIDC मध्ये भीषण स्फोट, 3 कंपन्यांना लागली आग

एकीकडे पक्षातील हा अंतर्गत वाद समोर येत असताना मनसे आता नव्या उमेदीनं समोर येण्याच्या तयारीत आहे. सत्तेवरून पाय उतार झाल्यानंतर भाजप आता विरोधी बाकावर बसली आहे. विरोधी बाकावर बसल्यानंतर भाजपने आता थेट मनसेशी हातमिळवणी करणार असल्याची चर्चा रंगली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा आम्ही मनसेला सोबत घेणार नाही, पण त्यांनी कार्यपद्धत बदलली तर भविष्यात एकत्र येऊ शकतो, असा सुतोवाच केला होता.

जिल्हा परिषद निवडणुकीत सपाटून पराभवाला सामोरं गेल्यानंतर भाजपची चिंतन बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेतली आणि मनसेला सोबत घेण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली होती.

इतर बातम्या - मनसे आणि भाजप युतीच्या प्रश्नावर रावसाहेब दानवेंची सावध प्रतिक्रिया

मनसे आणि भाजप एकत्र येण्याचा सध्या कोणताही विचार नाही. मनसेनं आपली विचार आणि कार्यपद्धत जर बदलली तर भविष्यात एकत्र येण्याचा विचार होऊ शकतो. पण सध्या मनसेची अशी कोणतीही विचार किंवा कार्यपद्धती व्यापक नाही. भाजप हा व्यापक विचाराने चालणारा पक्ष आहे. भविष्यात जर असा काही विचार झाला तर सर्वांनाच कळेल, असं म्हणत फडणवीस यांनी मनसेला सोबत घेण्याबाबत सूचक विधान केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 11, 2020 08:06 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading