S M L

दादरमधील कबुतरखाना बंद करा, मनसेची महापालिकेकडे मागणी

Samruddha Bhambure | Updated On: Jun 9, 2017 10:19 AM IST

दादरमधील कबुतरखाना बंद करा, मनसेची महापालिकेकडे मागणी

09 जून : दादरचा कबूतरखाना ही मुंबईची ओळख आहे. दादर स्टेशनपासून अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेला हाच ब्रिटिशकालीन कबुतरखाना कायमस्वरुपी बंद करण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केली आहे.

दादरमधल्या कबुतर खान्यामुळे आसपासच्या परिसरातील नागरिकांना श्वसनाचे अनेक प्रकारचे त्रास होत असल्यानं कबुतरखाना तातडीनं बंद करण्यात यावा, अशी मागणी मनसेचे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी मनपा आयुक्तांना पत्र लिहून केली आहे.

ग्रेड 2 ची हेरिटेज वास्तू असलेला दादरचा कबुतरखाना 1933 मध्ये पाण्याचा कारंजा म्हणून बांधण्यात आला होता. मात्र अनेक रहिवाशांनी नंतर तिथे कबुतरांना दाणे देण्यास सुरुवात केली. मात्र, कबुतरांमुळे दादरमधील अनेक रहिवासी, विशेषतः लहान मुलं आणि वयोवृद्ध नागरिकांना श्वसनाचे त्रास आणि अस्थमा झाल्याची तक्रार आमच्याकडे केली असल्याचं संदीप देशपांडे यांनी पत्रात म्हटलं आहे.तसंच, शहरात कबुतरांमुळे होणाऱ्या त्रासाला आळा घालण्यात महापालिका अयशस्वी ठरली असल्याचं सांगत, दादरमधील कबुतरखाना बंद करण्याची मागणी आम्ही करत आहोत, असं संदीप देशपांडे यांनी स्पष्ट केलं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 9, 2017 10:19 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close