Home /News /news /

बांगलादेशींविरोधात मनसेचा खळखट्याक, ‘राज’पुत्र शिकवणार मनसे स्टाईल धडा

बांगलादेशींविरोधात मनसेचा खळखट्याक, ‘राज’पुत्र शिकवणार मनसे स्टाईल धडा

...नाहीतर मनसे स्टाइल धडा शिकवला जाईल

    पनवेल, 4 फेब्रुवारी : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महामेळाव्यादरम्यान आपला झेंड्याचा रंग बदलला होता. याच वेळी राज ठाकरे यांचे पूत्र अमित ठाकरे सक्रिय राजकारणात सहभागी झाल्याचे जाहीर करण्यात आले होते. सध्या मनसेला राजकारणात टिकून राहण्यासाठी राजकीय अजेंडा असणं गरजेचं आहे, अशी प्रतिक्रिया येत आहे. मनसेने परप्रांतातून येणाऱ्या लोंढ्यांविषयी कायमच विरोध दर्शविला आहे. आता मात्र मनसेने बांगलादेशींविरोधात कंबर कसली आहे. मनसेने पनवेल रेल्वे स्टेशनजवळच एक पोस्टर लावले आहे. या पोस्टरवर ‘पनवेलमधील बांगलादेशींना निर्वाणीचा मनसे इशारा...चालते व्हा...नाहीतर मनसे स्टाइल धडा शिकवला जाईल’ असं लिहिलं आहे. या पोस्टरवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि त्यांचे सुपूत्र अमित ठाकरे यांचे छायाचित्र लावण्यात आलं आहे. पनवेल व मुंबईतील काही भागांमध्ये बांगलादेशींचे वास्तव्य आहे. बांगलादेशी येथे येऊन बोगस पॅन, रेशनिंग कार्ड़ बनवून घेतात. पनवेल हा भाग तर बांगलादेशी घुसखोरांचा अड्डाच झाला आहे. 2017 मध्ये मनसे कार्यकर्त्यांनी ठाण्यामध्ये मारहाण केली होती. परप्रातांतील मासे विक्रेत्यांची संख्या वाढत असल्याने येथून मूळ कोळी बांधवांचा हक्क हिरावून घेतला जात असल्याचे कारण पुढे करीत मनसेने मासे विक्रेत्यांनी मारहाण केली होती. महाराष्ट्रात मराठी माणसाला नोकरी, रोजगार यासाठी मनसेने कायमच आंदोलने आणि मारहाण केली आहे. सध्या मनसेने बांगलादेशींविरोधात मोर्चा वळविला आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Bangladeshi girls, MNS

    पुढील बातम्या