BREAKING: राज ठाकरेंच्या घरी पोहोचला कोरोना, घरकाम करणारे 2 पॉझिटिव्ह

BREAKING: राज ठाकरेंच्या घरी पोहोचला कोरोना, घरकाम करणारे 2 पॉझिटिव्ह

राज ठाकरेंच्या घरी घरकाम करण्याऱ्या 2 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे.

  • Share this:

मनाली पवार, प्रतिनिधी

मुंबई, 27 जून : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. अशात लॉकडाऊनचे नियम शिथिल केल्यामुळे मोठ्या प्रमाणात रुग्णांची संख्या वाढत आहे. अशात पुन्हा एकदा कोरोना राज ठाकरेंच्या कृष्णकुंजपर्यंत पोहोचला आहे. राज ठाकरेंच्या घरी घरकाम करण्याऱ्या 2 व्यक्तींना कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती समोर येत आहे. कोरोनाची लक्षणं आढळल्यामुळे त्यांची कोरोना चाचणी केली असता अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कोरोनाची लागण झालेल्या व्यक्तींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. खरंतर याआधीही राज ठाकरे यांच्या तीन सुरक्षा रक्षकांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, सुदैवाने आता हे सुरक्षारक्षक कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान, फक्त राज ठाकरेच नाही तर अनेक राजकीय नेत्यांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. राष्ट्रवादीचे नेते आणि सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही कोरोनाची लागण झाली होती. धनंजय मुंडे यांचे दोन स्वीय सहाय्यक आणि गाडी चालकाला देखील कोरोना झाला होता. विशेष म्हणजे राज्यमंत्री मंडळाच्या बैठकीत धनंजय मुंडे सहभागी झाले होते. या अगोदर मुंडे यांनी अंबाजोगाईत विषाणू निदान प्रयोग शाळेचं उदघाटन देखील केलं होतं. पण आता धनंजय मुंडे हे ठीक असून त्यांनी कोरोनावर मात करून घरी परतल्याची माहिती देण्यात आली आहे.

काही दिवसांपूर्वी राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनाही कोरोनाची लागण झाली होती. उपचारानंतर या आजारातून हे दोन्ही नेते बरे होऊन सुखरूप बाहेर पडले.

संपादन - रेणुका धायबर

First published: June 27, 2020, 8:18 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading