मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राज ठाकरेंच्या प्रश्नाला चिमुकलीनं दिली गोड पप्पी, VIDEO व्हायरल

राज ठाकरेंच्या प्रश्नाला चिमुकलीनं दिली गोड पप्पी, VIDEO व्हायरल

असे अनेक चाहते आहेत जे राज ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उत्स्तुक असतात. राज ठाकरेंच्या अशाच एका भन्नाट चिमुकल्या चाहतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

    मुंबई, 16 मार्च : स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर ठाकरे घराण्यात जर कोणाला सर्वाधिक पसंती मिळाली असेल तर ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे आहेत. राज ठाकरेंवर प्रेम करणारा आणि त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. असे अनेक चाहते आहेत जे राज ठाकरेंना भेटण्यासाठी त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी उत्स्तुक असतात. राज ठाकरेंच्या अशाच एका भन्नाट चिमुकल्या चाहतीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये एक लहान मुलगी तिच्या बाबांकडे मला राज ठाकरेंना भेटायचं आहे असं म्हणत असते. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खुद्द राज ठाकरेंनीच तिला भेटण्यासाठी आमंत्रण दिलं. सोमवारी या चिमुकली तिच्या आई-वडिलांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना भेटण्यासाठी कृष्णकुंजवर पोहोचले. याचादेखील एक अतिशय सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चिमुकलीला पाहताच राज यांनी तिला मायेनं जवळ घेतलं आणि मला का भेटायचं होतं असा प्रश्न विचारला. यावर चिमुकल्या गोड मुलीने राज ठाकरेंच्या गालावर पप्पी दिली. त्यानंतर राज ठाकरेंनी तिच्या डोक्यावर हात ठेऊन तिला आशीर्वाद दिला. तिला पिशवीमध्ये गोड खाऊसुद्धा दिला. या सगळा प्रसंग पाहून तिथे सगळ्यांना सुखद धक्का बसला. रुद्राणी असं या 3 वर्षाच्या मुलीचं नाव आहे. मनसे कार्यकर्ते प्रफुल्ल पाटील यांची ही कन्या आहे. रुद्राणी विषयी प्रफुल्ल यांना विचारलं असता माझी लेक राज ठाकरेंची खूप मोठी चाहती आहे. राज ठाकरेंची सभा सुरू झाली की ती टीव्हीसमोरून हलत नाही. मी सभेसाठी निघालो की ती माझ्यासोहत येण्याचा हट्ट धरते. तिचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि राज ठाकरेंनी तिलाा भेटण्यासाठी बोलावलं यासाठी मी त्यांचा ऋणी असल्याचं प्रफुल्ल म्हणाले.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या