राळेगणसिद्धी, 04 फेब्रुवारी: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज (मंगळवारी) ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांनी मनसेकडून अण्णांचा आंदोलनाला पाठिंबा देत असल्याचे जाहीर केले.
संबंधित बातमी: अण्णा हजारे यांच्या जीवाशी खेळू नका, उद्धव ठाकरे यांचे राज्य सरकारला पत्र
काय म्हणाले राज
- या नालायक लोकांसाठी जीवाची बाजी लावू नका
- सत्तेत असलेले सर्वजण खोटारडे लोक आहेत
- मोदीसाठी जीव धोक्यात घालू नका
- अण्णामुळे मोदी आज सत्तेत
- आज अरविंद केजरीवाल येथे यायला हवे होते
- कोण ओळखत होते केजरीवाल
- मोदींनी एकेकाळी अण्णांना पाठिंबा दिला होता
- गेल्या चार वर्षात काही केले नाही
- लोकपालासाठी काँग्रेसला शिव्या घालणारे भाजपवाले आज गप्प
VIDEO : राज ठाकरे यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट