राज यांचं पत्र...नेत्याचं ट्वीट...नयनतारा सहगल प्रकरणाला नवं वळण

राज यांचं पत्र...नेत्याचं ट्वीट...नयनतारा सहगल प्रकरणाला नवं वळण

यवतमाळमध्ये आयोजित '९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात' ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीवरून सुरू असलेल्या वादंगाविषयी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'नं अधिकृत भूमिका मांडल्यानंतर या प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे.

  • Share this:

मुंबई, 07 जानेवारी : यवतमाळमध्ये आयोजित '९२व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात' ज्येष्ठ लेखिका नयनतारा सहगल यांच्या उपस्थितीवरून सुरू असलेल्या वादंगाविषयी 'महाराष्ट्र नवनिर्माण सेने'नं अधिकृत भूमिका मांडल्यानंतर या प्रकरणाला आता नवं वळण लागलं आहे.

"साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या नयनतारा सहगल यांच्या संमलनातील उपस्थितीला माझ्या एका कार्यकर्त्याने जरी विरोध केला असला तरी मनसेचा अध्यक्ष म्हणून माझा अजिबात विरोध नाही", अशी स्पष्ट भूमिका राज ठाकरे यांनी मांडली होती.

त्यावर आता मनसे नेता संदीप देशपांडे यांनी ट्विटरवरून भाजपवर टीका केली आहे. 'मनसेच्या खांद्यावर बंदूक ठेवून नयनतारा सहगल यांना रोखण्याचा भाजपाचाच डाव होता' अशी टीका त्यांनी ट्विटरच्या माध्यामातून केली आहे.

'महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या खांद्यावर बंदूक ठेऊन नयनतारा सहगल यांना रोखण्याचा भाजप चा डाव राजसाहेबांच्या पत्रकामुळे उधळला गेला' असं ट्वीट त्यांनी केलं आहे.

दरम्यान, 'जोपर्यंत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे सरकारी अनुदानाच्या पैशावर होत राहतील तोपर्यंत अशीच शरणागती पत्करण्याची हतबलता राहिल' असं अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी म्हटलं आहे.

"साहित्यिक म्हणून गेली 40 वर्षे संमेलनासाठी सरकारी अनुदान घेऊ नका असं सांगतं आहे. पण यावर कुणीही गंभीरतेनं विचार करण्यास तयार नाही" असेही जोशी म्हणाले. दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी साहित्य संमेलनाला ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सेहगल यांना बोलावण्यास पक्षाचा विरोध नव्हता ही भुमिका जाहीर केल्याबद्दल महामंडळाच्या वतीने ठाकरे यांचे आभार मानले.

"राज ठाकरे स्वत: एक कलावंत आहेत. त्यांनी नयनतारा सहगल यांना बोलावण्यावरून व्यक्त केलेल्या भुमिकेमुळे राज यांच्या बद्दलचा आदर केवळ द्विगुणीतच नाही तर शतगुणीत झाल्याचं भालचंद्र जोशी म्हणाले.

UNCUT VIDEO : राज ठाकरे यांनी सांगितली 'एका लग्नाची पहिली गोष्ट'

First published: January 7, 2019, 1:25 PM IST

ताज्या बातम्या