Home /News /news /

VIDEO: बदलापूरात Lockdownवरुन मनसे आक्रमक; पालिका अधिकाऱ्यावर मनसे कार्यकर्ते गेले धावून

VIDEO: बदलापूरात Lockdownवरुन मनसे आक्रमक; पालिका अधिकाऱ्यावर मनसे कार्यकर्ते गेले धावून

बदलापूर शहरात कडक लॉकडाऊन लावण्याच्या निर्णयावरुन मनसे कार्यकर्ते चांगलेच संतापल्याचं पहायला मिळालं.

बदलापूर, 7 मे: बदलापूर शहरात कडक लॉकडाऊन (strict lockdown in Badlapur) लावण्याच्या निर्णयावरुन नागरिकांत संभ्रम निर्माण झाल्याचं पहायला मिळत आहे. लॉकडाऊन लावण्यात येण्याच्या वृत्ताने नागरिकांमध्ये गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. याच मुद्द्यावरुन आज बदलापूर शहरातील मनसेच्या (MNS) कार्यकर्त्यांनी नगरपालिकेत गोंधळ घातला. इतकेच नाही तर पालिका अधिकाऱ्यांवर धावून गेल्याचंही समोर आलं आहे. ही संपूर्ण घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. झालं असं की, बदलापूर शहरात वाढत्या कोरोना बाधितांच्या संख्येमुळे स्थानिक आमदार किसन कथोरे यांनी लॉकडाऊन लावण्याबाबत म्हटलं. आमदार किसन कथोरे यांनी केलेलं हे वक्तव्य संपूर्ण बदलापूरमध्ये जोरदार व्हायरल झालं. आमदार किसन कथोरे, पालिका मुख्याधिकारी आणि पोलीस प्रशासनाच्या बैठकीत कडक लॉकडाऊनचा निर्णय झाला होता. शनिवार 8 मे पासून 15 मे पर्यंत कडक लॉकडाऊनचा घेण्यात आला होता. यानंतर नागरिकांनी आज सकाळपासूनच बाजारात खरेदीसाठी मोठी झुंबड केली होती. याच मुद्द्यावरुन मनसेने आक्रमक होत गोंधळ घातला. वाचा: महाविकास आघाडीत पुन्हा मानापमान नाट्य; काँग्रेस आमदार झिशान सिद्दीकी अनिल परबांवर संतापले लॉकडाऊन लावायचा की नाही हा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांचा असताना पालिकेने नागरिकांच्या मनात संभ्रम का निर्माण केला? असा प्रश्न उपस्थित करत मनसेचे कार्यकर्ते पालिकेत दाखल झाले. पालिकेत दाखल झालेल्या मनसे कार्यकर्त्यांनी या संदर्भात पालिकेचे उपमुख्यधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी उपमुख्याधिकाऱ्यांनी मनसे कार्यकर्त्यांना म्हटलं, तुमची मनसेच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडे तकार करेन. यावरुन मनसे कार्यकर्ते चांगलेच संतापले आणि त्यांनी उपमुख्याधिकाऱ्यांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रयत्न केला. तसेच पालिकेत ठिय्या आंदोलनही केलं. बदलापूर शहरात गेल्या अनेक दिवसांपासून कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होत असताना आता कडक लॉकडाऊन लावण्यात येणार असल्याने नागरिकांनी बाजारपेठेत तोबा गर्दी केली. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होणार नाही का? असा प्रश्नही मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थित केला आहे.
Published by:Sunil Desale
First published:

Tags: Badlapur, Coronavirus, MNS

पुढील बातम्या