राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसे कार्यकर्ते आणि अभिनेता एजाज खानमध्ये जुंपली

राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसे कार्यकर्ते आणि अभिनेता एजाज खानमध्ये जुंपली

अभिनेता एजाज खान यांनी राज ठाकरे यांनी दिलेल्या मरकजच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती.

  • Share this:

मुंबई, 05 एप्रिल : राज ठाकरे यांच्या पत्रकार परिषदेनंतर मनसे कार्यकर्ते आणि अभिनेता एजाज खान यांच्या जुंपली आहे. अभिनेता एजाज खान यांनी राज ठाकरे यांनी दिलेल्या मरकजच्या विधानावर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. अशा लोकांवर गोळ्या झाडल्या पाहिजेत असं राज म्हणाले होते, त्यावर एजाज खान म्हणाले की, त्यांच्यावर उपचार करायला हवेत पण त्यांना गोळ्या घाला असं भडकाऊ भाषण राज ठाकरे यांनी केलं. राज ठाकरेंच्या संपूर्ण पत्रकार परिषदेवर आक्षेप घेत एजाज खान यांनी एक व्हिडिओ फेसबुकवर शेअर केला आहे. यावर आता मनसेच्या कार्यकर्त्याने प्रतिक्रिया दिली आहे.

पोलीस कर्मचाऱ्यावर एक व्यक्ती थुंकत असल्याच्या व्हिडिओसंबंधी राज ठाकरे म्हणाले होते. पण तो एक कैदी आहे. जेव्हा मुलाला आईने आणलेले अन्न दिले जात नाही, तेव्हा त्याने रागाने असे केलं. त्यामुळे न कळता अशी विधाने करू नका असं एजाज खान म्हणाला. त्यावर मनसे कार्यकर्ते अखिल चित्रे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

ते म्हणाले की, 'ह्या धर्मांधानी लक्षात ठेवावं संचारबंदी थोड्या दिवसांसाठी आहे,नंतर आम्ही आहोतच. @AjazkhanActor मराठी मैं समझ नाही आयी बात तो हिंदी मैं केहता हूँ.. याद रखना लॉकडाऊन सिर्फ कुच्छ दिनो के लिये है, फिर हम यही है भूलना मात.'

राज ठाकरेंच्या पत्रकार परिषदेनंतर एजाज खान यांनी हा व्हिडिओ शेअर केला. त्यावर अनेकांनी कमेंट्स केल्या आहेत. त्यामुळे राज यांनी वक्तव्यानंतर आता मनसे आणि एजाज खान यांच्यात जुंपली आहे.

First published: April 5, 2020, 1:44 PM IST
Tags: raj thacke

ताज्या बातम्या