विधान परिषद निवडणुकीत विरोधकांची मतं अखेर फुटलीच !

विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं मतदान फुटलंय. कुंपानावर असलेल्या आमदारांनी थेट भाजपला मतदान केलंय. विशेषतः नितेश राणेंनी पक्षाला उघडपणे काँग्रेस पक्षाला आव्हान दिलंय. किमान 10 मतं भाजपला मिळतील अशी भीती दोन्ही पक्षांना होती. त्यात नितेश राणे, कालिदास कोलंबकर, रमेश कदम यांनी उघड बंडखोरी करत भाजपला मतदान केलं.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Dec 7, 2017 05:57 PM IST

विधान परिषद निवडणुकीत विरोधकांची मतं अखेर फुटलीच !

07 डिसेंबर, मुंबई : विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचं मतदान फुटलंय. कुंपानावर असलेल्या आमदारांनी थेट भाजपला मतदान केलंय. विशेषतः नितेश राणेंनी पक्षाला उघडपणे काँग्रेस पक्षाला आव्हान दिलंय. किमान 10 मतं भाजपला मिळतील अशी भीती दोन्ही पक्षांना होती. त्यात नितेश राणे, कालिदास कोलंबकर, रमेश कदम यांनी उघड बंडखोरी करत भाजपला मतदान केलं.

भविष्यात शिवसेनेला वाचक बसावा यासाठी भाजपनं विधानपरिषद निवडणूक प्रमुख अस्त्र केलाय. काँग्रेस राष्ट्रवादीची किमान 10 ते बारा मत फुटल्यास शिवसेने शिवाय सत्ता चालवत येईल हा संदेश भाजपला देणे आहे. गेल्या दोन महिन्यांपासून राज्यात सरकार विरोधी वातावरण निर्माण झालाय. त्याच प्रमाणे विधान परिषद निवडणुकीत अपेक्षे पेक्षा अधिक मत मिळाल्यास त्याचा गुजरात निवडणूक प्रचारात वापर करता येईल असा भाजप चा मानस आहे विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस ला मत फुटण्याची भीती होती . ती काहीशी खरी ठरली.

भाजपला मतदान करताना नितेश राणे यांनी जाहीरपणे काँग्रेसविरोधात भूमिका मांडली. नितेश राणे म्हणाले, ''नारायण राणेंचा स्वत:चा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष आहे. मी नारायण राणेंचा कार्यकर्ता आहे. त्यामुळे माझं मत कोणाला गेलं हे वेगळं सांगायला नको.राणेंनी निवडणूक लढवली हे यांच्यासाठी चांगलच नाहीतर आज अनेकांचे वस्त्रहरण झाले असते. राणेंसाठी ८-९ मतं अधिक हवी होती. आमच्याकडे २५ मतं अधिक होती. पक्ष विरोधी भूमिका घेतल्याने कारवाई करण्याची हिंमत तर करू देत,'' असं थेट आव्हानच नितेश राणेंनी काँग्रेस पक्षाला दिलंय. त्यावर बंडखोर आमदारांवर काँग्रेस पक्षाकडून कारवाई केली जाणार असल्याचं राधाकृष्ण विखेपाटलांनी स्पष्ट केलंय. पण कारवाई काय करणार याविषयी राधाकृष्ण विखे पाटील काही बोलले नाहीत.

त्यावर तात्काळ प्रत्युत्तर देताना नितेश राणे म्हणाले, ''पक्षविरोधी काम केलं त्यांच्यावर कारवाई केली जाईल. माझ्यावर जे अशा टीका करतात त्यांना महत्व देत नाही 'आदर्श' नेते असताना काय कारवाई करणार.. महाराष्ट्राला चांगले विरोधी पक्षनेते लाभले आहेत. कमी बोलतात, पाहीजे तितकच बोलतात.''

तिकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे रमेश कदम यांनी देखील पक्ष विरोधी भूमिका घेतलीय . रमेश कदम म्हणाले, ''गेली सव्वा दोन वर्षे मी तुरुंगात आहे. या काळात मी राजकीय वातावरण बघितले आहे. मी केवळ महामंडळातून कर्ज वाटप केले आहे.अनेकांनी कोट्यवधींचे घोटाळे केले पण त्यांना जमीन मिळतोय, मात्र मला अजून नाही. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही, जे मला ओळखतात त्यांना माहिती आहे मी कुठल्याच दबावाला जुमानत नाही असं बोलायलाही कदम विसरले नाहीत''

Loading...

मतदान संपेपर्यंत 288 पैकी 280 मतदान झालं होतं

BJP -120

Shivsena- 62

NCP- 40

Cong -42

Mim च्या दोन्ही आमदारांनी मतदान केलं नाही

या निवडणुकीचे निकाल थोड्याच वेळात लागेल पण या आमदारांना कारवाईची धमकी देण्यापालीकडे पक्ष काही करवाई करायची हिम्मत दाखवेल, असं वाटत नाही

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 7, 2017 05:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...