विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार टळणार का?

विधान परिषदेच्या निवडणुकीत घोडेबाजार टळणार का?

निवडणुकांतील घोडेबाजार टाळण्यासाठी विधानपरिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे.

  • Share this:

मुंबई,ता.4 जुलै: निवडणुकांतील घोडेबाजार टाळण्यासाठी विधानपरिषदेच्या 11 जागांची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता आहे. निवडणूक बिनविरोध झाल्यास भाजपच्या 5, शिवसेनेच्या 2, काँग्रेसच्या 2, राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आमदार निवडून येईल. 11 वी जागा शेकापचे जयंत पाटील लढवणार आहेत. सर्वपक्षीय संबंधांमुळे पाटील बिनविरोध निवडून येण्याची शक्यता आहे. मात्र राष्ट्रवादीला पाठिंबा देणाऱ्या जयंत पाटलांविरोधात उमेदवार देऊन त्यांना धुळ चारावी असा एक मतप्रवाह देखील भाजपमध्ये आहे. त्यामुळे भाजपश्रेष्ठी काय निर्णय घेतात त्यावर अनेक गोष्टी अवलंबून आहे.

मात्र उमेदवार उभा करण्याची शक्यता कमी असल्याचं सुत्रांचं म्हणणं आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा गुरूवार हा शेवटचा दिवस असून दुपार पर्यंत चित्र स्पष्ट होणार आहे. 11 जागांसाठी 16 जुलैला ही निवडणूक होणार आहे.

विधानपरिषदेवर कुणाची वर्णी?

भाजप

महादेव जानकर

भाई गिरकर

राम पाटील-रातोळीकर

रमेश पाटील

नीलय नाईक

काँग्रेस

शरद रणपिसे

मिर्झा वजाहत अख्तर

राष्ट्रवादी

बाबा जानी दुर्रानी

शिवसेना

अनिल परब

मनिषा कायंदे

शेकाप

जयंत पाटील

हेही वाचा...

नरेंद्र मोदींचा 2019 जिंकण्यासाठी मास्टर स्ट्रोक!

मुलं चोरणाऱ्या टोळीचं हे आहे खरं सत्य!

अलिबागमध्ये एकाच कुटूंबातल्या पाच जणांनी घेतलं विष, सर्वांची प्रकृती गंभीर

'ढेरपोट्या' पोलिसांना विश्वास नांगरे पाटलांची खास आॅफर !

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 4, 2018 06:40 PM IST

ताज्या बातम्या