News18 Lokmat

शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांना उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री जवळचे - रवी राणा

शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिक जवळचे आहेत असं मत अपक्ष आमदार रवी राणा यांनी व्यक्त केलंय.

News18 Lokmat | Updated On: Jul 26, 2018 02:42 PM IST

शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांना उद्धव ठाकरेंपेक्षा मुख्यमंत्री जवळचे - रवी राणा

सागर वैद्य, मुंबई,ता. 26 जुलै : शिवसेनेच्या आमदार आणि मंत्र्यांना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अधिक जवळचे आहेत असं मत अपक्ष आमदार रवी राणा यांनी व्यक्त केलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बदलले गेले तर सर्व 6 अपक्ष आमदार राज्यातील भाजप सरकारचा पाठिंबा काढून घेतील असंही त्यांनी स्पष्ट केलं. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी राज्यात सुरू असलेल्या आंदोलनाचा संदर्भ देत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बदलाची चर्चा असल्याचं वक्तव्य केलं होतं त्या पार्श्वभूमीवर राणा यांनी 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना ही भूमिका मांडलीय. मुख्यमंत्री अडचणीत आले असताना अपक्ष आमदार त्यांच्या मदतीला धावून आले आले असं म्हटलं जातय.

'मराठी' तरूणांनो जीव गमावू नका, तुमची वाट पाहणारं घरी कुणीतरी आहे! - राज ठाकरे

सांगलीत मराठा आंदोलकांनी जाळल्या एसटी बस, पहा हा LIVE व्हिडिओ

मुख्यमंत्रीपदावर देवेंद्र फडणवीस नसतील तर शिवसेना सुद्धा त्या सरकारचा पाठिंबा काढेल. काही लोक मुख्यमंत्र्यांना अडचणीत आण्याचा प्रयत्न करत आहेत. शिवसेना आमदारांमध्ये आणि मंत्र्यांमध्ये मुख्यमंत्र्यांविषयी चांगली भावना असून त्यांच्यात उत्तम समन्वयही आहे. मात्र मुख्यमंत्र्यांना अस्थिर करण्याचा प्रयत्न होत आहे असंही रवी राणा यांनी म्हटलंय.

मुंबईमध्ये भरदिवसा शाळेसमोर 17 वर्षीय विद्यार्थ्याची हत्या

Loading...

'चलो अयोध्या, चलो वाराणसी', शिवसेनेची होर्डिंगबाजी

राज्यभर सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेकडून मुख्यमंत्री आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली जातेय. तर बुधवारी खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री बदलाची भाजपममध्येच चर्चा सुरू असल्याचं वक्तव्य करत नव्या चर्चेला तोंड फोडलं. मात्र अशी कुठलीही चर्चा पक्षात नसल्याचं भाजपने स्पष्ट केलं आणि अफवा पसरविण्याचं काम सुरू असल्याची टीकाही शिवसेनेवर केली.

असा होता कारगिल युद्धाचा घटनाक्रम, सर्वस्व पणाला लावून पाकचा केला होता पराभव

पहाटे तीन पर्यंत जागून काम करणाऱ्या व्यक्तीला कोण पदावरून काढणार असं कौतुक करत महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची बुधवारी पाठराखण केली होती तर आज अपक्ष आमदार रवी राणा हे मुख्यमंत्र्यांच्या मदतीला धावून आलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 26, 2018 02:42 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...