याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारा आमदार ठाकरे सरकारमध्ये, कॅबिनेट मंत्री म्हणून घेतली शपथ

याकूब मेमनच्या फाशीला विरोध करणारा आमदार ठाकरे सरकारमध्ये, कॅबिनेट मंत्री म्हणून घेतली शपथ

1993 साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनची मुस्लीम आमदार आणि नगरसेवकांनी पाठराखण केली होती.

  • Share this:

मुंबई, 30 डिसेंबर : 1993 साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनच्या फाशीला ज्या आमदाराने विरोध दर्शवला होता त्या आमदाराने आता ठाकरे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. या आमदाराचं नाव आहे काँग्रेस आमदार अस्लम शेख. अस्लम शेख यांनी महाविकास आघाडीच्या आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली आहे. पण 28 जुलै 2015ला याच अस्लम शेख यांनी याकूब मेमन फाशीला विरोध केला होता.

1993 साखळी बॉम्बस्फोटातील दोषी याकूब मेमनची मुस्लीम आमदार आणि नगरसेवकांनी पाठराखण केली होती. याकूब मेमनच्या फाशीच्या विरोधात काही मुस्लीम आमदार आणि नगरसेवकांनी माजी राष्ट्रपती भारतरत्न प्रणव मुखर्जी यांना पत्र पाठवलं होतं. याकुबला फाशी न देता जन्मठेपेची शिक्षा द्यावी अशी मागणी या आमदारांनी राष्ट्रपतींकडे केली होती. यामध्ये आमदार अस्लम शेख यांच्या नावाचीदेखील स्वाक्षरी होती.

नसीम खान, अमिन पटेल, अस्लम शेख, शेख असिफ शेख रशीद, मुझफ्फर हुसेन, हुसनाबानो खलीफ, युसूफ अब्रहानी आणि जावेद जुनेजा यांच्या या पत्रावर स्वाक्षर्‍या होत्या. हे पत्र राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आलं होतं. दरम्यान, याकूब मेमनची फाशी रद्‌द करण्याचं पत्र राष्ट्रपतींना देणार्‍या या सहा आमदारांच्या विरोधात त्यावेळी शिवसेनेनं हक्कभंगाचा प्रस्ताव आणलाा होता. आणि आता तेच अस्लम शेख यांची ठाकरे सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून वर्णी लागली आहे.

असा पार पडला महाविकास आघाडीचा शपथविधी सोहळा

दरम्यान, राजभवनाच्या पांगणात मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला राष्ट्रगीताने सुरुवात झाली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे तिन्ही पक्षाच्या मंत्र्यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी राज्याच्या उप-मुख्यमंत्रिपदाची तर परळीचे आमदार धनंजय मुंडे, कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी कॅबिनेट कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, विजय वडेट्टीवारांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. तिन्ही पक्षांचे एकूण 36 मंत्री शपथ घेतली. तिन्ही पक्षांनी आपापसांत कोणती खाती वाटून घ्यायची हे निश्चित केले आहे.

इतर बातम्या - मंत्रिमंडळ विस्तारानंतर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया, शपथविधीवर म्हणाले...

हे आमदार झाले 'मंत्री'...

>शिवसेना नेते शंभूराज देसाई यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> बच्चू कडू यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> डॉ. विश्वजीत कदम यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> दत्तात्रय भरणे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> राष्ट्रवादीच्या आमदार आदिती तटकरे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली

> राष्ट्रवादीचे नेते संजय बनसोडे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली

> राष्ट्रवादीचे नेते प्राजक्त तनपुरे यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली

> शिवसेनेला पाठिंबा देणारे आमदार राजेंद्र येड्रावकर यांनी राज्यमंत्रिपदाची शपथ घेतली

> शंकरराव गडाख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> असलम शेख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> शिवसेनेचे नेते अॅड. अनिल परब यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> काँग्रेसचे नेते के. सी. पाडवी यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> राष्ट्रवादीचे नेते सतेज पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> राष्ट्रवादीचे नेते बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> शिवसेना नेते संदीपान भुमरे यांचा शपथविधी

> जितेंद्र आव्हाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> दादा भुसे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली

> शिवसेनेचे यवतमाळ येथील आमदार संजय राठोड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> काँग्रेसचे सावनेर येथील आमदार सुनील केदार यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे घनसावंगी येथील आमदार राजेश टोपे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे अणुशक्तीनगर येथील आमदार नवाब मलिक यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे सिंदखेड राजा येथील आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> काँग्रेसच्या धारावी येथील आमदार वर्षा गायकवाड यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे काटोल मतदार संघाचे आमदार अनिल देशमुख यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवारांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> राष्ट्रवादी काँग्रेसचे परळीचे आमदार धनंजय मुंडे यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> काँग्रेसचे दिलीप वळसे पाटील यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> काँग्रेसचे आमदार अशोक चव्हाण यांनी घेतली कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ

> अजित पवार यांनी घेतली राज्याच्या उप-मुख्यमंत्रिपदाची शपथ

Published by: Renuka Dhaybar
First published: December 30, 2019, 7:23 PM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading