मिथुनची दत्तक मुलगी दिशानी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज

बॉलीवूडचा 'डिस्को डॉन्सर' फेम हिरो अर्थात मिथुन चक्रवर्ती यांची लाडकी मुलगी दिशानी बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दिशानी ही मिथुनची दत्तक मुलगी आहे.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Aug 22, 2017 07:42 PM IST

मिथुनची दत्तक मुलगी दिशानी बॉलिवूड पदार्पणासाठी सज्ज

मुंबई, 22 ऑगस्ट : बॉलिवूडचा 'डिस्को डॉन्सर' फेम हिरो अर्थात मिथुन चक्रवर्ती यांची लाडकी मुलगी दिशानी बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे दिशानी ही मिथुनची दत्तक मुलगी आहे. दिशानी अगदी तान्ही असताना कोलकाता शहराबाहेरील एका कचराकुंडीत सापडली होती. त्यावेळी गरिबांचा दाता अशी ओळख असलेल्या मिथून दादाने तिला दत्तक घेतले आणि मोठ्या लाडाने वाढवले.

दिशानी आता मोठी झाली असून सध्या ती न्यूयॉर्कमध्ये फिल्म अकॅडमीत अभिनयाचे धडे गिरवतेय. दिशानी नेहमीच आपल्या वडीलांसोबत प्रेज थ्री पार्ट्यांमधून झळकत असते. सेलिब्रिटी डॉटर असल्याने दिशानी इतर स्टार किड्सप्रमाणेच स्टायलिश आणि ग्लॅमरस आहे. ती लेटेस्ट फॅशन फॉलो करताना दिसते.

दिशानी चक्रवर्ती असून सोशल मीडियावरही बऱ्यापैकी सक्रिय असते. मिथुन चक्रवर्ती दिशानीला इतर तीन मुलांइतकाच संपत्तीत वाटा देणार आहेत. मिथुन चक्रवर्तीचं हे पितृत्व आणि दातृत्व नक्कीच कौतुकास पात्र म्हणावं लागेल. सलमान खानचे वडील सलीम खान यांनीही अर्पिताला दत्तक घेऊन वाढवलं आहे. सलमानचं आपल्या लाडक्या बहिणीवरचं प्रेम तर सगळ्यांनाच ठाऊक आहे. सुश्मिता शेन हिनेही दोन मुलीला दत्तक घेतलं असून त्यांचा ती सांभाळ करतेय. रवीना टंडनेही एका मुलीला दत्तक घेतलं असून ती तिचा सांभाळ करतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 22, 2017 07:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...