मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /मिथुन चक्रवर्तीच्या या सिनेमाला मिळत नव्हता डिस्ट्रीब्यूटर पण प्रदर्शित होताच घातला धुमाकूळ

मिथुन चक्रवर्तीच्या या सिनेमाला मिळत नव्हता डिस्ट्रीब्यूटर पण प्रदर्शित होताच घातला धुमाकूळ

मिथुन चक्रवती यांनी 80 ते 90 च्या दशकात अनेक हिट सिनेमे दिले

मिथुन चक्रवती यांनी 80 ते 90 च्या दशकात अनेक हिट सिनेमे दिले

बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत ज्यांना प्रदर्शनाची अनेक वर्षे वाट पाहावी लागली. मात्र असे काही सिनेमे आहेत जे रिलीज झाल्यानंतर सुपरहिट झालेत. असाच एक मिथुन चक्रवती यांचा सिनेमा आहे ज्याने यशाचे सर्व रेकॉर्ड तोडेले...

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 31 मार्च- अनेकदा सिनेमाच्या शुटींगचे किस्से कानावर येत असतात तेव्हा तो सिनेमा कसा असणार याबद्दल मनात एकप्रकारची उत्सुकता तयार झालेली पाहायला मिळते. सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली असते. मात्र सिनेमा रिलिजच्या मार्गावर असताना सिनेमाला जर डिस्ट्रीब्यूटर मिळत नसेल तर निर्माता आणि दिग्दर्शकासमोक एकप्राकराचा पेच निर्माण होतो. एवढं कष्ट करून जर सिनेमा प्रदर्शित होणार नसेल तर याहून वाईट दुख काहीच असु शकत नाही.बॉलिवूडमध्ये असे अनेक सिनेमे आहेत ज्यांना प्रदर्शनाची अनेक वर्षे वाट पाहावी लागली. मात्र असे काही सिनेमे आहेत जे रिलीज झाल्यानंतर सुपरहिट झालेत. असाच एक मिथुन चक्रवती यांचा सिनेमा आहे ज्याने यशाचे सर्व रेकॉर्ड तोडेले...

मिथुन चक्रवती यांनी 80 ते 90 च्या दशकात अनेक हिट सिनेमे दिले आहेत. त्यांनी अभिनयाच्या जीवावर एक वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांना पडद्यावर पाहण्यासाठी प्रेक्षक नेहमी उत्साही असतं. मिथुन यांची सुरूवातीच्या काळात एक अॅक्शन हिरो म्हणून झाली होती. अशा काळात भावनिक आणि लव्हा ड्रामा असलेले सिनेमे करनं त्यांच्यासाठी तर कठीण होतचं पण प्रेक्षकांना देखील हा बदल सहज रुचनं अवघड होतं.

वाचा-सैफ अली खान -अमृता सिंगचं नातं का तुटलं? घटस्फोटामागे 'ही' अभिनेत्री होती कारण

रोमॅंटिक ड्रामासाठी केलं होतं कास्ट

दिग्दर्शक विजय सदाना यांनी मिथुन यांच्या अॅक्शन हिरोच्या इमेजला छेद देत एक रोमॅंटिक ड्रामा सिनेमा बनवला. या सिनेमाचं नाव ‘प्यार झुकता नहीं’ (Pyar Jhukta Nahin) असं होतं. या सिनेमात

पद्मिनी कोल्हापुरे (Padmini Kolhapure) यांची देखील प्रमुख भूमिका होती. यासोबतच डॅनी डेंजोंगप्पा (Danny Denzongpa), असरानी (Asrani) आणि ​बिंदू (Bindu) यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका होत्या. सिनेमाचे निर्माते

केसी बोकाड़िया (KC Bokadia) होते. या सिनेमात मिथुन यांची भूमिका काहीशी वेगळी होती. त्यामुळे सिनेमाला एकही डिस्ट्रीब्यूटर्स मिळत नव्हता. निर्मात्यांनी खूप प्रयत्न केले मात्र सिनेमाला डिस्ट्रीब्यूटर्स मिळणं अवघडं झालं होतं. सगळ्यांना सिनेमा चालणार नाही याची भीती वाटत होते.

दोन वर्ष पाहावी लागली वाट

सिनेमाला डिस्ट्रीब्यूटर्स न मिळाल्याने दिग्दर्शक, निर्माते आणि कलाकार देखील निराश झाले होते. या कारणास्तव हा सिनेमा 2 वर्षे रखडला होता. यानंतर केसी बोकाडिया यांनी स्वत: हा चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला. हा चित्रपट 11 जानेवारी 1985 रोजी प्रदर्शित झाला आणि त्याने सर्वांचे नशीब बदलून टाकले. त्यावेळी मिथुन आणि पद्मिनी ही एक प्रसिद्ध जोडी बनली, दोघांचा हा पहिलाच सिनेमा होता पण त्यानंतर दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले.

50 लाखांपेक्षा कमी बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाने 2.5 कोटींपेक्षा जास्त बिझनेस केला आणि ब्लॉकबस्टर ठरला. 'प्यार झुक्ता नहीं' हा त्या वर्षातील तिसरा सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला. या चित्रपटातील गाणीही खूप गाजली होती, ज्यातील ‘तुमसे मिलकर ना जाने क्यों…’ हे गाणं आजही हिट आहे. हा चित्रपट 1977 मध्ये आलेल्या 'आयना' या पाकिस्तानी चित्रपटाचा रिमेक होता.

First published:
top videos

    Tags: Entertainment, Marathi entertainment