हॅमिल्टन,31 जानेवारी : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या फॅन्सची कमी नाही. तिची कामगिरी पुरुष संघातील स्टार खेळाडूंनाही मागं टाकणारी आहे. आता तिचा एका लहान चाहत्यासोबतचा फोटो चर्चेत आहे. तो लहान चाहता भारताचा सलामीवीर शिखर धवनचा मुलगा आहे.
शिखर धवन आणि आयेशाला 4 वर्षांचा झोरावर नावाचा मुलगा आहे. सध्या धवनची पत्नी आणि मुलगा दोघेही त्याच्यासोबत न्यूझीलंडमध्ये आहेत. धवनची पत्नी आयेशाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटो, व्हिडिओ शेअर केले आहेत.
आयेशाने झोरावर आणि मिताली राज यांचा एक फोटो शेअर केला आहे. यात मिताली आणि तिचा हा चिमुकला चाहता हसताना दिसत आहे. हा फोटो आवडत्या फोटोपैकी एक असल्याचं आयेशानं म्हटलं आहे. तसंच आपला महिला संघाला नेहमीच पाठिंबा असेल असा कॅप्शन आयेशानं दिला आहे.
मिताली राजसोबत हसऱ्या चेहऱ्याने उभा दिसणारा झोरावर किती खट्याळ आहे ते शिखर धवनच्या इन्स्टाग्रामवर दिसतं. शिखर धवनने काही व्हिडिओ शेअर केले आहेत. त्यातील एका व्हिडिओत झोरावर शिखर धवनच्या खांद्यावर बसला आहे. तो धवनच्या डोक्यावर मिठ टाकत आहे.
झोरावर भारतीय संघातील इतर खेळाडूंसोबतही दंगामस्ती करतो. हिटमॅन रोहित शर्मासोबतचा एक व्हिडिओ धवनने शेअर केला आहे. त्यामध्ये झोरावर रोहित शर्मासोबत दंगामस्ती करताना दिसत आहे.