MIT ला दणका, अंतर्वस्त्रांचा उल्लेख असलेली डायरी रद्द

MIT ला दणका, अंतर्वस्त्रांचा उल्लेख असलेली डायरी रद्द

विद्यार्थिनींनी कोणत्या रंगांची अंतर्वस्त्रे घालावीत या आणि अशासारख्या वादग्रस्त नियमांचा उल्लेख असलेली पुण्यातील MIT विश्वशांती गुरुकुल शाळेची डायरी अखेर रद्द झाली आहे.

  • Share this:

पुणे, ता.5 जुलै: विद्यार्थिनींनी कोणत्या रंगांची अंतर्वस्त्रे घालावीत या आणि अशासारख्या वादग्रस्त नियमांचा उल्लेख असलेली पुण्यातील MIT विश्वशांती गुरुकुल शाळेची डायरी अखेर रद्द झाली आहे. न्यूज18लोकमतने बुधवारी याबाबतचं वृत्त पहिल्यांदा दिलं होतं. त्यानंतर सर्वच स्तरातून या तुघलकी निर्णयाला प्रचंड विरोध झाला. गुरूवारी सकाळी पुणे महापालिकेच्या शिक्षणाधिकाऱ्यांनी शाळेला भेट देऊन शाळा प्रशासनाला ती वादग्रस्त डायरी रद्द करण्याचा आदेश दिला.

तुघलकी निर्णय, विद्यार्थिनींनी कोणत्या रंगाची अंतर्वस्त्रे घालावीत हेही ठरवणार शाळा

विद्यार्थ्यांना खेळायला पाठवून झोपा काढणारे मास्तर कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

काय होतं त्या डायरीत?

विद्यार्थिनींनी कोणत्या रंगांची अंतर्वस्त्रे घालावीत या अजब अटीसह कोणत्या वेळी पाणी प्यावं, कोणत्या वेळी लघवीला जावं, किती सेंटीमीटरचे कानातले घालावेत, हेही शाळेच्या रजिस्टरमध्ये नमूद करण्यात आलं होतं, जर नियम मोडून पाणी पिताना, खाताना विद्यार्थी दिसला तर दंडाची तरतूद करण्यात आली होती. विशेष म्हणजे हे सगळे नियम,अटी मान्य आहेत असं प्रतिज्ञापत्र लिहून द्यायची सक्ती करण्यात आली आहे.

‘जो शीशे के घर मे रहते है, वो दुसरो के घर पे पत्थर नही फेकते’,- मुख्यमंत्र्यांचे प्रत्युत्तर

६ सप्टेंबरपर्यंत टोलबंदीबाबत राज्य सरकारने अंतिम निर्णय घ्यावा, मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश

ग्रंथालयातून नेलेली जुनी पुस्तके परत न देणाऱ्यांसाठी अतिरिक शुल्क, सायकल पार्किंग करता वर्षाला 1500 रुपये अशी शुल्क रचना करण्यात आली होती. त्यामुळं पालकांमध्येही प्रचंड नाराजी होती. पालकांनी शिक्षण विभागाकडे याची तक्रार दिली होती. ही शाळा पुणे महापालिकेच्या अखत्यारीत येत असल्याने पालिकेचे पालिकेच्या अधिकाऱ्यांनी चौकशी केली आणि हा निर्णय घेतला.

शाळा प्रशासनाच्या या निर्णयाला विविध राजकीय पक्ष आणि पालकांनी तीव्र तीव्र विरोध केला होता.

 

 

First published: July 5, 2018, 4:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading