'मिशन अॅन्टी हिंदू' देशातले 36 जण होते 'टार्गेट'वर

'मिशन अॅन्टी हिंदू' देशातले 36 जण होते 'टार्गेट'वर

पत्रकार गैरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेला अमोल काळे याच्या तपासातून कट्टर हिंदूत्ववादांच्या 'मिशन अॅन्टी हिंदू'ता पर्दाफाश झालाय.

  • Share this:

अजित मांढरे, मुंबई, ता. 21ऑगस्ट : पत्रकार गैरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणात अटकेत असलेला अमोल काळे याच्या तपासातून कट्टर हिंदूत्ववादांच्या 'मिशन अॅन्टी हिंदू'ता पर्दाफाश झालाय. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर, पत्रकार गौरी लंकेश, एम एम कलबुर्गी आणि कॉम्रेड गोविंद पानसरे यांच्या हत्येकरता अमोल काळे यानं शुटर्स पुरवल्याचे तपासात समोर आलय. तसच या चारही हत्यांचे कट रचणारे जण महाराष्ट्र राज्याचेच असून एकाला सीबीआयने अटक केलीये तो म्हणजे डॉक्टर विरेंद्र तावडे आणि दुसरा मास्टर माईंड कोण? याचा शोध आता तपास यंत्रणा करतायेत.

'मिशन अॅन्टी हिंदू'साठी ५० 'मोस्ट डेयरिंग' शुटर्स आणि रेकी मास्टर्स या अमोल काळेच्या संपर्कात होते ज्यांच्या सहाय्याने देशातील एकूण ३६ लोकांच्या हत्येची योजना होती. ज्यात १६ जण महाराष्ट्र राज्यातील, १० कर्नाटक राज्यातील आणि १० जण विविध क्षेत्रातील होते. अमोलच्या डायरीवमध्ये या ३६ लोकांमध्ये साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते, संघटनेचे पदाधिकारी, राजकीय नेते, प्रसार माध्यमांतील काम करणारे आणि सरकारी अधिकारी यांचा समावेश होता. या विचारवंतांच्या हत्यांनंतर काही साहित्यिकांसोबतच सीबीआयचे मुंबईतील २ अधिकारी, महाराष्ट्र पोलीस दलातील ४ अधिकारी आणि प्रसार माध्यमांत काम करणारे दोन जण मोस्ट टार्गेटवर होते.

त्यांना मारण्याचा कट देखील रचण्यात आला होता पण त्याआधीच विरेंद्र तावडेला अटक झाल्याने. 'मिशन अॅन्टी हिंदू' थांबवण्यात आले. आणि पुढील आदेशाची वाट पाहिली जात होती. हे आदेश देणारा विरेंद्र तावडे व्यतिरिक्त कोण होता याचा शोध लागला नसून तपास यंत्रणा त्याचा शोध घेत आहे. 'मिशन अॅन्टी हिंदू'नुसार डॉ. नरेंद्र दाभोळकर यांना मारण्याचा प्लान विरेंद्र तावडे यानं बनवला होता. त्यासाठी विरेंद्र तावडे अनेकदा पनवेल ते पुणे बाईकने प्रवास करुन पुण्याला जायचा. आणि पुण्यात विविध ठिकाणी तावडे अमोल काळेची भेट घ्यायचा.

या भेटीत झालेल्या चर्चेनुसार 'मिशन अॅन्टी हिंदू'चे पहिले ऑपरेशन पार पाडण्यासाठी शार्प शुटर आणि सराईत लोकांची गरज होती. यानुसार अमोल काळेच्या डायरीतील औरंगाबादचे दोन तरूण तरुण शरद कळसकर आणि सचिन अंदुरे या दोघांची नावं अमोल काळे ने विरेंद्र तावडलेला दिली त्या नंतर तावडे, कळसकर आणि अंदुरे या तिघांनी दाभोळकरांना मारण्यासाठी प्लान आखून त्यांची हत्या केली. या हत्येनंतर कोणीच पोलीसांच्या हाती लागले नसल्याने गोविंद पानसरे, एम एम कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्या केल्या गेल्या.

पण नंतर मुख्य मास्टर माईंड पैकी एक विरेंद्र तावडेला अटक झाल्याने मिशन 'मिशन अॅन्टी हिंदू'थांबवण्यात आले आणि तावडेला अटक करणाऱ्या सीबीआय अधिका-याला मारण्याचा कट रचण्यात आला. या अधिकाऱ्याची हत्या करुन तपास यंत्रणांमध्ये भिती पसरवायची होती असाही खुलासा अमोल काळे आणि इतर ९ जणांच्या अटकेतून झालाय. पण त्या अधिकाऱ्याच्या हत्ये आधीच अमोल काळे, परशुराम वाघमारोची अटक झाल्याने मिशन 'मिशन अॅन्टी हिंदू'चा पर्दाफाश झाला आणि सर्व कटच फसला.

 विराटचे शतक अनुष्काला फ्लाईंग किस !

First published: August 21, 2018, 10:26 AM IST

ताज्या बातम्या