दारू पिऊन उल्टी केली म्हणून काढून घेतला ‘मिस पेरु’चा किताब

दारू पिऊन उल्टी केली म्हणून काढून घेतला ‘मिस पेरु’चा किताब

माझ्या परवानगीशिवाय माझं शूट केलं आणि फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. या सर्व गोष्टी मला बदनाम करण्यासाठी केल्या आहेत.

  • Share this:

मिस पेरू एनयेला ग्रादोस (Anyella Grados) तिचाच एक व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे अडचणीत सापडली आहे. सोशल मीडियावर एनयेलाचा एक व्हिडीओ समोर आला आहे. यात ती दारू पिऊन उल्टी करताना दिसत आहे. मिस पेरूची ही गोष्ट तिलाच महागात पडली. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बुधवारी एनयेलाकडून तिचा मिस पेरू हा किताब काढून घेण्यात आला.


गेल्या आठवड्यात एनयेला हा व्हिडीओ फार चर्चेत आला. उत्तर पेरूतील एका नाइटक्लबमध्ये पार्टी केल्यानंतर २० वर्षीय एनयेला उल्टी करताना पाहण्यात आलं. या व्हिडीओमध्ये एनयेला हॉटेल रूमच्या बेडवर बसली असून तिथेच उल्टी करताना दिसत होती.

हे फुटेज सोशल मीडियावर वाऱ्यासारखं पसरलं. डेली मेलच्या रिपोर्टनुसार हा व्हिडीओ मिस टीन पेरू २०१८ कॅमिला कनिकूबाने (Camila Canicoba) रेकॉर्ड केला होता.


व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर कॅमिला म्हणाली की, हे फुटेज व्हायरल करण्याचा तिचा कोणताही मानस नव्हता. पण तिच्याकडून चुकून हा सोशल मीडियावर शेअर झाला. तर एनयेला म्हणाली की, तिच्या परवानगीशिवाय तिचा व्हिडीओ शूट करणाऱ्यावर ती कायदेशीर कारवाई करेल.


एनयेला म्हणाली की, ‘मी त्या व्यक्तिविरोधात कायदेशीर कारवाई करणार आहे. माझ्या परवानगीशिवाय माझं शूट केलं आणि फोटो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. या सर्व गोष्टी मला बदनाम करण्यासाठी केल्या आहेत.’ तसेच व्हिडीओ व्हायरल झाल्यावर आणि किताब काढून घेतल्यानंतरही एनयेलाला एक अजून धक्का बसला. आता एनयेलाला मिस यूनिव्हर्स स्पर्धेत सहभागी होता येणार नाही.

VIDEO: वडिलांचं नाव लावणं हा आमचा जन्मसिद्ध हक्क - पंकजा मुंडे


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Apr 1, 2019 09:12 PM IST

ताज्या बातम्या