कोरोना व्हायरसचा गर्भ नाभीवरही गंभीर परिणाम, मुंबईत गर्भपाताचं प्रकरण पाहून डॉक्टरही हैराण

कोरोना व्हायरसचा गर्भ नाभीवरही गंभीर परिणाम, मुंबईत गर्भपाताचं प्रकरण पाहून डॉक्टरही हैराण

कोरोना संसर्गामुळे त्रैमासिकाआधीच महिलेचा गर्भपात झाला आहे. कारण कोरोना विषाणूचा संसर्ग नाभी आणि प्लेसेंटापर्यंत पोहोचला.

  • Share this:

मुंबई, 24 ऑगस्ट : देशात कोरोना (Coronavirus) संक्रमनाच्या घटना जितक्या वेगाने वाढत आहेत तितक्या वेगाने व्हायरसमध्ये (Virus) नवे बदल समोर येत आहेत. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचा SARS-CoV-2 हा संसर्ग गर्भवती महिलांसाठी मोठा धोक्याचा आहे. मुंबईतही याचं एक प्रकरण समोर आलं आहे. ज्यामध्ये कोरोना संसर्गामुळे त्रैमासिकाआधीच महिलेचा गर्भपात झाला आहे. कारण कोरोना विषाणूचा संसर्ग नाभी आणि प्लेसेंटापर्यंत पोहोचला.

कांदिवली इथल्या ESIS (कर्मचारी राज्य विमा योजना) रुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ रीप्रोडक्टिव्ह हेल्थ (NIRRH) यांनी प्रसिद्ध केलेल्या संशोधनात असं म्हटलं आहे की, हे भारतातलं पहिलंच प्रकरण आहे जिथे दोन आठवड्यांमध्ये कोरोना संसर्ग टिशूमध्ये जिवंत राहिला. त्यामुळे SARS-CoV-2 संसर्ग फक्त शरीरातच जिवंत राहिला नाही तर त्यामुळे शरीरात कोरोना विषाणूची संख्याही वाढली आणि म्हणून त्याचा महिलेच्या गर्भाशयात धोका वाढला.

कोण सांभाळणार काँग्रेसची कमान, आजच्या बैठकीत होणार मोठा निर्णय

गर्भवती महिला ही रुग्णालयात सुरक्षा रक्षक असल्याची माहिती देण्यात आली आहे. दोन महिने गर्भवती असताना या महिलेची कोरोना चाचणी केली गेली. तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आली. त्यानंतर महिलेने 5 आठवड्यांपूर्वी म्हणजे जेव्हा ती 13 आठवड्यांची गर्भवती होती. तेव्हा तिची पुन्हा एकदा कोरोनाची चाचणी केली गेली. तेव्हा तिची प्रकृती ठीक असल्याचं सांगण्यात आलं. पण त्यानंतर अल्ट्रासाउंट केलं असता बाळाचा गर्भाशयात मृत्यू झाल्याचं समोर आलं.

LIVE : धक्कादायक! बीड कारागृह कोरोनाचा हॉस्पॉट, 24 तासांत 59 कैदी पॉझिटिव्ह

या घटनेमुळे कोरोना संक्रमणाच्या संशोधनात आणखी वेग आला आहे. यासंबंधी अनेक लॅब तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे. अशात कोरोनाचा संसर्ग थांबण्याचं काही नाव घेत नाहीये. रोज कोरोना रुग्णांची नवी संख्या समोर येत आहे. त्यामुळे नागरिकांनी आणि विशेष करून गर्भवती महिलांना अधिक काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात आलं आहे.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 24, 2020, 9:57 AM IST

ताज्या बातम्या