मुंबई, 02 डिसेंबर: 'मिर्झापूर-2' (Mirzapur)सारख्या सर्वोत्कृष्ट वेबसिरीजमध्ये ललितची भूमिका करणारा ब्रह्म मिश्रा याचा त्याच्या राहत्या घरात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं आहे. गेल्या चार वर्षापासून तो मुंबईतील अंधेरी येथे राहत होता. दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याच्या छातीत दुखत होतं. यानंतर तो डॉक्टरकडेही गेला होता. डॉक्टरांनी त्याला काही गॅसेसची औषध देऊन घरी जाण्यास सांगितलं होतं.
दरम्यान आज अंधेरीतील अभिनेत्याच्या शेजारच्यांनी दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना याबाबत सूचना दिली. ब्रम्ह मिश्रा घराचं दार उघडत नसल्याने चावीवाल्या व्यक्तीला बोलावून दार उघडण्यात आलं. दरम्यान बाथरूममधून दुर्गंधी येत असल्याचं पोलिसांना आढळून आलं. पोलिसांनी पाहिलं तर मिश्रा हा पालथा पडला होता व त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत अर्धनग्न होता. 'मिर्झापूर-2' मध्ये याने ललितची भूमिका साकारली होती. दरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. दरम्यान दोन ते तीन दिवसांपूर्वी त्याचा मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
दिव्येंदू शर्माने इंस्टाग्रामवर ललितचा फोटो शेअर करत दु:खद बातमी शेअर केली. ललितच्या भूमिकेतून सर्वांची मने जिंकणाऱ्या ब्रह्मा इतक्या कमी वयात जाणे सर्वांनाच धक्का बसला आहे. दिव्येंदू शर्माची पोस्ट पाहून तो आता आपल्यात नाही यावर कोणाचाही विश्वास बसत नाही.
मिर्झापूर या वेबसिरीजमध्ये मुन्ना भैय्याचा जवळचा मित्र ललितची भूमिका साकारणाऱ्या ब्रह्म मिश्रा यांचे निधन झाले आहे. त्याचा सहकारी कलाकार दिव्येंदू शर्माने सोशल मीडियावर ही माहिती दिली आहे. ही दु:खद बातमी समजल्यानंतर ब्रम्हा मिश्रा उर्फ ललितच्या चाहत्यांमध्ये धक्का बसला आहे. Rip पोस्ट लिहिताना दिव्येंदूने ब्रम्हा मिश्राचा स्वतःसोबतचा एक फोटो शेअर केला आहे आणि 'Our Lalit Is No more" म्हणजे आमचा ललित आता या जगात नाही अशी पोस्ट लिहिली आहे.
वाचा : VIDEO: रणबीर कपूरने पायाने ढकलला आलियाचा लेहंगा; पाहून भडकली अभिनेत्री
ब्रह्म मिश्राने अनेक चित्रपट आणि मालिकांमध्ये काम केले होते. परंतु त्याला ओळख मिळाली ती मिर्झापूर-2 च्या साईड रोलमधून. या सिरिजमधील त्याची व्यक्तिरेखा पाहिल्यानंतर क्वचितच कोणी असेल ज्याचे त्याच्याकडे लक्ष गेले नसेल. एवढेच नाही तर त्याने ललितचे पात्र त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट आणि हिट पात्र असल्याचे सांगितले. एका मुलाखतीदरम्यान त्याने सांगितले की, ही त्याच्या आयुष्यातील सर्वोत्तम भूमिका होती.
View this post on Instagram
या सिरिजमधील त्याची भूमिका इतकी लोकप्रिया झाली होती की त्याच्यावर अनेक मीम्सही व्हायरल झाले. भोपाळचा रहिवासी असलेला ब्रह्म मिश्राचे लहानपणापासूनच अभिनेता होण्याचे स्वप्न होते. 2013 मध्ये 'चोर चोर सुपर चोर' या चित्रपटाद्वारे त्याने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर त्याने अक्षय कुमारच्या केसरी या चित्रपटातही 'खुदाद खान'ची भूमिका साकारली होती.
वाचा : बॉक्सिंग दरम्यान अभिनेत्रीसोबत रोमँटिक झाला 'KGF' फेम अभिनेता; PHOTO झाले VIRAL
ब्रह्म मिश्रा मनोज बाजपेयींना आपला आदर्श मानात होता. अनेकवेळी तो त्यांच्यासोबत फोटो क्लिक करण्याची संधी सोडत नसे. त्याने स्वत: मनोज बाजपेयी यांचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत ते आपले आदर्श असल्याचे सांगितले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Bollywood News, Entertainment