जिगरी दोस्तावर राग होता पण तरी त्याच्यासोबत पार्टी केली आणि नंतर कायमचं संपवलं!

जिगरी दोस्तावर राग होता पण तरी त्याच्यासोबत पार्टी केली आणि नंतर कायमचं संपवलं!

पांडुरंग वाडी, काशीमिरा येथे मर्डर हर्षल सुरेश कारखिले वय-28, रा. हनुमान मंदिर जवळ, पेनकरपाडा येथे वास्तव्यास होता. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

  • Share this:

विजय देसाई, प्रतिनिधी

मिरारोड, 19 नोव्हेंबर : मिरारोड येथील काशीमिरा परिसरातील पेनकरपाडा येथे राहणाऱ्या तरुणाची त्याच्या मित्रानेच पैशाच्या वादातून हत्या केल्याची घटना घडली आहे. पांडुरंग वाडी, काशीमिरा येथे मर्डर हर्षल सुरेश कारखिले वय-28, रा. हनुमान मंदिर जवळ, पेनकरपाडा येथे वास्तव्यास होता. या संपूर्ण प्रकरणात पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

काशीमिरा परिसरातील पेनकरपाडा येथे राहणारा हर्षल कालखिरे( 30) हा आणि रायकरवाडी येथे राहणार अविनाश बामणे हे दोघे मित्र होते. अविनाश हा डेकोरेटर तर हर्षल हा डीजे चे काम करत होता. हे दोघे मित्र होते आणि ते नेहमी बरोबर असायचे. हर्षल याने अविनाशकडे डीजेचे काम केले त्या कामाचे 27000 हजार रुपये बाकी होते. ते बऱ्याच दिवसापासून हर्षल हा अविनाश कडे मागत होता परंतु त्याला अविनाश पैसे देत नसल्यामुळे त्यांच्यात वाद चालू होता.

मोठी बातमी - शिवसेना आणि भाजपमध्ये सगळं काही संपलं नाही, दिवाकर रावतेंनी दिले संकेत

या वादातून हर्षल याने अविनाशचे स्पीकर उचलून नेले होते. पैसे दिले तर स्पीकर परत देणार असे सांगितले. तो वाद 18 नोव्हेंबर रोजी दहिसर येथे झाला. हा वाद दहिसर पोलीस ठाण्यात गेला तेथे दोघांचा वाद मिटवण्यात आला आणि अविनाश याने पैसे देण्याचे मान्य केले. यांच्यात राग अविनाशच्या मनात होता. यानंतर ते रात्री पुन्हा एकत्र आले . ते एकत्र दारू प्यायले. त्यानंतर रात्री त्यांच्यात भांडण झाले. त्या भांडणात हर्षल याचा मृत्यू झाला.

अविनाश आणि त्याच्या मित्राने नंतर त्याचा मृतदेह डेल्टा गार्डन समोर नेऊन टाकली. सकाळी मृतदेहाला एकाने पाहिल्यानंतर प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी अविनाश याला अटक केली आहे. त्याबरोबर त्याच्या मित्रालाही अटक केली आहे. पुढील तपास काशीमिरा पोलीस करत आहेत.

Published by: Renuka Dhaybar
First published: November 19, 2019, 9:10 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading