मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

एका सेकंदानं हुकला मृत्यू! स्पीडमध्ये अगदी जवळून गेली महिंद्रा व्हॅन अन् तो..., पाहा VIDEO

एका सेकंदानं हुकला मृत्यू! स्पीडमध्ये अगदी जवळून गेली महिंद्रा व्हॅन अन् तो..., पाहा VIDEO

ज्याला साक्षात परमेश्वर वाचवू इच्छितात त्याला कोण मारणार? असाच प्रकार केरळमध्ये घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

कोलम, 23 ऑगस्ट : देव तारी त्याला कोण मारी, अशी म्हण मराठीमध्ये प्रचलित आहे. ज्याला साक्षात परमेश्वर वाचवू इच्छितात त्याला कोण मारणार? असाच प्रकार केरळमध्ये घडला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. रस्त्यावरून चालत असलेल्या इसमाच्या अगदी जवळून टेम्पो गेला, मात्र त्या व्यक्तीला काही झाले नाही. चावरा थट्टाशीरी येथील विजयपालास येथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात हा व्हिडीओ कैद झाला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. शुक्रवारी सकाळी राष्ट्रीय महामार्गावरील विजयपालस येथे ही घटना घडली. रस्त्याच्या कडेने जात असलेस्या एक इसमाच्या दिशेने एक व्यक्ती चालत होती. त्याच्या मागून व्हॅन आणि एक लॉरी दुसर्‍या दिशेने येताना या व्हिडीओमध्ये दिसत आहे. मागून येणाऱ्या मिनी व्हॅनचा ताबा सुटला आणि वेगानं रस्त्याच्या कडेनं चालत असलेल्या व्यक्तीच्या जवळून गेली. मात्र या व्यक्तीला खरचटलेही नाही, आणि व्हॅन जवळ असलेल्या झाडावरून जाऊन आपटली. वाचा-...आणि बघता बघता अख्खा डोंगर खचला, पाहा थरारक LIVE VIDEO वाचा-...आणि हायवेवर लेन सोडून एकमेकांवर आदळल्या 4 गाड्या, भीषण अपघाताचा VIDEO VIRAL बाजूने गेलेली व्हॅन पाहून रस्त्याच्या कडेनं चालत असलेली ही व्यक्ती घाबरली, आणि पळू लागली. या सगळ्या घटनेचा व्हिडीओ रस्त्यावर असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या व्हिडीओमध्ये चमत्कारीकरित्या या व्यक्तीचे प्राण वाचल्याचे दिसत आहे. वाचा-मर्सिडीज, बुगाटी आणि पोर्शची झाली टक्कर, नुकसान ऐकून येईल चक्कर; पाहा हे PHOTOS दरम्यान, या अपघातानंतर चवरा पोलिसांनी व्हॅन चालकाची चौकशी केली. त्याच्यावर अद्याप गुन्हा दाखल करण्यात आला नाही आहे. मात्र गाडी चालवताना त्याला डुलकी लागल्यामुळे हा अपघात घडल्याचे पोलिसांनी सांगितले.
First published:

पुढील बातम्या