Home /News /news /

Mumbai: अल्पवयीन मुलीचा दीड लाखांत सौदा, सापळा रचून 2 दलालांना अटक

Mumbai: अल्पवयीन मुलीचा दीड लाखांत सौदा, सापळा रचून 2 दलालांना अटक

Crime in Mumbai: जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या एका अल्पवयीन मुलीचा दीड लाखांत सौदा केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

    मीरारोड, 01 जानेवारी: जबरदस्तीने वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या एका अल्पवयीन मुलीचा दीड लाखांत सौदा (minor girl deal in 1.5 lakh) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून बोली लावणाऱ्या दोन महिला दलालांना अटक (2 accused arrested) केली आहे. संबंधित दोन्ही आरोपी महिला वेश्याव्यवसायासाठी मुली पुरवण्याचं काम करत होत्या. अवैध मानव तस्करी शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाईंदर याठिकाणी एका अल्पवयीन मुलीचा वेश्याव्यवसायासाठी दीड लाखांत सौदा केल्याची माहिती अवैध मानव तस्करी शाखेचे पोलीस निरीक्षक संपतराव पाटील यांना मिळाली होती. यानंतर पाटील यांनी आपल्या पोलीस पथकाच्या मदतीने भाईंदर पश्चिमेच्या कस्तुरी गार्डनजवळ साई केशव माधव इमारतीतील चिल आउट हॉटेल परिसरात सापळा रचला. यावेळी संबंधित दलाल महिलांनी ग्राहक पुरुषाकडून दीड लाख रुपये स्वीकारताच पोलिसांनी आरोपींना रंगेहाथ अटक केली आहे. हेही वाचा-नोकरीची लालूच देऊन तरुणींची विक्री, वेश्याव्यवसाय करण्यासाठी टाकला दबाव छापेमारी करत पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीची सुटका केली. या प्रकरणी भाईंदर पोलीस ठाण्यात 28 डिसेंबर रोजी बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमासह अन्य कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोन्ही आरोपी दलाल महिला सध्या पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी केली जात आहे. संबंधित महिला वेश्याव्यवसायासाठी तरुण मुलींचा पुरवठा करत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. हेही वाचा-प्रियकराच्या मदतीने केला पतीचा खून, रचला आत्महत्येचा बनाव; असा झाला उलगडा संबंधित महिलांनी याआधीदेखील अशाच प्रकारे काही मुलींना वेश्याव्यवसायात ओढलं असावं, असा संशयही पोलिसांना आहे. त्याअनुषंगाने पोलीस आरोपी महिलांची कसून चौकशी करत आहेत. तसेच या रॅकेटमध्ये आणखी कोणाचा संबंध आहे का? याचा तपास देखील केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Mumbai

    पुढील बातम्या