मंडी, 23 सप्टेंबर: देवांची भूमी समजल्या जाणाऱ्या हिमाचल प्रदेशात बहीण-भावाच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका अल्पवयीन बहिणीनं भावावर (Rape) लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. पीडित मुलगी गरोदर (Pregnant) राहिल्यानंतर हे प्रकरण उजेडात आलं आहे. पीडिता मुलीनं आईला सर्व हकीकत सांगितली. त्यानंतर पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी (Accused) भाऊ फरार आहे. आरोपी हा पीडितेचा मामेभाऊ आहे.
हेही वाचा..शरीर सुखाला नकार दिल्यानं भावाजयीचा खून, पुणे जिल्ह्यातील थरारक घटना
मिळालेली माहिती अशी की, मंडी जिल्ह्यातील उपमंडल सुंदरनगर परिसरातील एका खेडे गावात ही घटना घडली आहे. आरोपीनं त्याच्या आत्याच्या 13 वर्षीय अल्पवयीन मुलीचं वारंवार लैंगिक शोषण केलं. पीडित मुलगी 9 वीची विद्यार्थिनी आहे. आरोपी भाऊ अभ्यासाच्या बहाण्यानं पीडितेवर लैंगिक अत्याचार करत होता. एवढं नाही तर याबाबत कुठे वाच्यता करायची नाही, अशी धमकी देखील आरोपीनं पीडितेला दिली होती. मात्र, पीडिता गरोदर राहिल्यानंतर तिचं लैंगिक शोषण झाल्याच खुलासा झाला.
पीडितेला पोटात वेदना सुरू झाल्यानंतर तिच्या आईनं तिला सिव्हील हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. डॉक्टरांनी मुलीची तपासणी केल्यानंतर ती गरोदर असल्याचं सांगितलं. आईनं मुलीला विश्वासात घेऊन याबाबत विचारणा केली असता तिनं आपबिती सांगितली.
पीडितेच्या आईनं थेट सुंदरनगर पोलीस स्टेशन गाठले आणि पोलिसांत तक्रार दाखल केली. डीएसपी सुंदरनगर गुरबचन सिंह यांनी सांगितलं की, पीडितेचा जबाब नोंदवण्यात आला आहे. भादंवि कलम 376, 506 आणि पॉक्सो कायद्यांतर्गत कलम 6 नुसार आरोपी भावाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आरोपीच्या शोधार्थ पोलीस पथके रवाना झाली आहेत.
नराधम पतीचं मित्रासोबत आपल्याच अर्धांगिनीशी अनैसर्गिक कृत्य
दुसरीकडे, अशीच एक घटना दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्रात उघडकीस आली होती. नराधम पतीनं मित्रासोबत आपल्याच अर्धांगिनीशी अनैसर्गिक कृत्य करून अत्याचार केला आहे. ही धक्कादायक घटना जळगाव शहरात उघडकीस आली आहे.
जळगाव शहरात पिंप्राळा भागातील प्रल्हाद नगरात ही धक्कादायक घटना घडली आहे. आरोपी पती व त्याच्या मित्राविरुद्ध रामानंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी नराधम पतीला ताब्यात घेतले असून दुसरा आरोपी फरार आहे. सदर पीडित महिला, तिचा पती व तीन मुले जून महिन्यांपासून आरोपी मित्राच्या घरात भाड्यानं राहात होते. आरोपी एकटाच राहात होता. नराधम पती आपल्या पत्नीला मित्रासोबत शारीरिक संबंध ठेवण्यास जबरदस्ती करत होता. मात्र, तसं करण्यास पीडितेचा विरोध होता. पतीनं वाद घातला. मित्रासोबत शरीर संबंध ठेवण्यास तो जबरदस्ती करत होता. तो घराबाहेर पडला. येताना तो कोल्ड्रिक्स घेऊन आला. कोल्ड्रिक्स प्यायल्यानंतर पीडितेला चक्कर आले. त्यातच नराधम पतीनं तिला पकडलं आणि मित्रानं तिच्यावर अत्याचार केला. नराधम पतीनं पत्नीचे दोन्ही हात पकडून ठेवले आणि मित्रानं तिच्यावर अनैसर्गिक कृत्य करत अत्याचार केला. नंतर याबाबत वाच्यता केल्यास मुलांना जीवे ठार मारण्याची धमकी पतीनं आपल्या पत्नीला दिली.
हेही वाचा...पुत्राच्या हव्यासापोटी बाळाचं लिंग पाहण्यासाठी गर्भवती पत्नीचं पोट फाडलं; आता...
नंतर नराधम पतीनं पत्नीला माहेरी पाठवून दिलं. पीडितेनं सर्व प्रकार आपल्या आई-वडिलांना सांगितला. नंतर थेट पोलिस स्टेशन गाठून पीडितेनं पोलिसांना आपबिती सांगितली. पीडितेच्या तक्रारीवरून पती व त्याचा मित्र रमेश काकडे या दोघांविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अकबर पटेल यांनी दिली आहे.