तुमचे नातेवाईक किंवा मित्र जर विदेशात असतील तर त्यांच्यासाठी आहेत आता नवीन नियम

तुमचे नातेवाईक किंवा मित्र जर विदेशात असतील तर त्यांच्यासाठी आहेत आता नवीन नियम

तुमचे नातेवाईक जर विदेशात अडकले असतील तर त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 03 ऑगस्ट : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus Pandemic) जीवघेण्या महामारीमुळे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं मोठा निर्णय घेतला आहे. आंतरराष्ट्रीय प्रवास करणाऱ्यांसाठी काही नवीन मार्गदर्शक तत्त्वं जाहीर करण्यात आली आहेत. त्यामुळे तुमचे नातेवाईक जर विदेशात अडकले असतील तर त्यांच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, 24 मे रोजी एअर इंडियाने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा हवाला देत अधिकृत अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. 8 ऑगस्टपासून ही मार्गदर्शक तत्त्वे लागू होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मार्गदर्शक तत्वानुसार परदेशातून येणाऱ्या नागरिकांना 14 दिवसांसाठी क्वारंटाईन ठेवणं आवश्यक असणार आहे.

याशिवाय 7 दिवस पेड इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईनमध्ये आणि 7 दिवस होम (Home Quarantine) क्वारंटाईनमध्ये राहावं लागेल. सर्व प्रवाश्यांना भारतात येण्यापूर्वी किमान 72 तास आधी newdelhiairport.in वर घोषणापत्र द्यावं लागेल.

प्रवासाआधीचे नियम

- ऑनलाईन पोर्टलवरून सर्व प्रवाशांना प्रवासाच्या 72 तास अगोदर सेल्फ डिक्लरेशन फॉर्म जमा करावा लागतो.

- प्रवासानंतर 14 दिवस क्वारंटाईनमध्ये आणि पुढील 7 दिवस होम क्वारंटाईनमध्ये रहावे लागेल याची पोर्टलद्वारे माहिती द्यावी लागेल. काही कठीण परिस्थिती असेल तरच प्रवाशांना फक्त 14 दिवसासाठी होम क्वारंटाईन होण्याती परवानगी असेल.

सुशांतच्या आत्महत्या प्रकरणी अमृता फडणवीसांची उडी, ट्विटकरून मुंबईकरांवर म्हणाल्या

- क्वारंटाईन टाळण्यासाठी प्रवाशाला नेगिटिव्ह आरटी-पीसीआर अहवाल द्यावा लागेल. हा अहवाल पोर्टलवर देखील अपलोड करावा लागेल.

- तपास अहवाल 96 तासांपेक्षा जुना असू नये.

- गर्भवती महिलेला घरी क्वारंटाईन ठेवण्याची परवानगी दिली जाऊ शकते. जर मुल 10 वर्षांपेक्षा कमी वयात असेल तर होम क्वारंटाईनसाठी परवानगी दिली जाऊ शकते.

पुण्यातला धक्कादायक प्रकार, पोलिसांनीच घडवून आणला शेतकऱ्यावर खुनी हल्ला

प्रवासानंतरचे नियम

- सर्व प्रवाशांना त्यांच्या मोबाईलवर आरोग्य सेतु अ‍ॅप डाउनलोड करणं बंधनकारक आहे.

- ज्यांना थर्मल स्क्रीनिंग दरम्यान कोरोनाची कोणतीही लक्षणे नसतात त्यांना बोर्डिंगसाठी परवानगी दिली जाईल.

- विमानतळावरील खबरदारीसाठी स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण बंधनकारक आहे. बोर्डिंग दरम्यान प्रवाशांना सोशल डिस्टिंसिगच्या नियमांचं पालन करावं लागेल.

Published by: Renuka Dhaybar
First published: August 3, 2020, 2:05 PM IST
Tags:

ताज्या बातम्या