जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची 'पिस्तुलगिरी' पुन्हा वादात !

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची 'पिस्तुलगिरी' पुन्हा वादात !

जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची पिस्तुलगिरी पुन्हा वादात सापडलीय. यावेळी ते चक्क पिस्तुल घेऊन नरभक्षक बिबट्याच्या शिकारीला निघाल्याचं आढळून आलंय. जळगावातल्या वरखेडे शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याच्या शोधमोहिमेत त्यांनी त्यांचं स्वतःचं पिस्तूल वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय.

  • Share this:

27 नोव्हेंबर, जळगाव : जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची पिस्तुलगिरी पुन्हा वादात सापडलीय. यावेळी ते चक्क पिस्तुल घेऊन नरभक्षक बिबट्याच्या शिकारीला निघाल्याचं आढळून आलंय. जळगावातल्या वरखेडे शिवारात धुमाकूळ घालणाऱ्या बिबट्याच्या शोधमोहिमेत त्यांनी त्यांचं स्वतःचं पिस्तूल वापरल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. पिस्तूल हे स्वसंरक्षणासाठी असताना बिबट्याला मारण्यासाठी गिरीश महाजन ते कसं काय वापरू शकतात? असा सवाल उपस्थित केला जातोय.

धक्कादायक बाब म्हणजे वनखात्याच्या या शोधमोहिमेत जलसंपदामंत्री स्वतः आघाडीवर असल्याचं आढळून आलंय. विशेष म्हणजे वनखात्याच्या शोधमोहिमेचं कोणतंही प्रशिक्षण घेतलेलं नसताना जलसंपदामंत्री अशी 'हिरोगिरी' कशी काय करू शकतात ? मूळात नरभक्षक बिबट्याला पकडणं हे वनखात्याचं काम असताना जलसंपदामंत्री नेमकं तिथं काय करत होते ? बिबट्याला मारण्याचा अधिकार मंत्र्यांना कुणी दिला? गिरीश महाजनांना कायदा कळत नाही का ? असे एक ना अनेक सवाल उपस्थित झालेत.

यापूर्वीही गिरीश महाजन लहान मुलांच्या शाळेच्या एका कार्यक्रमात कमरेला पिस्तुल लावून गेल्याने वादात सापडले होते. त्यावेळी त्यांच्यावर बरीच टीकाही झाली होती. त्यानंतरही गिरीश महाजन यांनी त्यातून काहीच धडा घेतलेला दिसत नाही. दरम्यान, हा जळगावच्या वरखेडे शिवारात फिरणारा बिबट्या हा नरभक्षक बनल्यानेच शासनाने त्याला मारण्याचे आदेश दिलेत. असा खुलासा करत गिरीश महाजनांनी त्यांच्या या पिस्तुलगिरीचं जोरदार समर्थन केलंय. गिरीश महाजन यापूर्वी अनेकदा ट्रक चालवणे. ढोल वाचवणे, अशा प्रकारचे पब्लिसिटी स्टंट करताना करताना आढळून आलेत. त्यामुळे आतातरी मुख्यमंत्री आपल्या या लाडक्या मंत्र्यांच्या चमकोगिरीला आवर घालणार का हेच पाहायचं आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 27, 2017 09:13 PM IST

ताज्या बातम्या