S M L

महाराष्ट्राच्या 98 टक्के रस्त्यांवरील खड्डे आम्ही बुजवले- चंद्रकांत पाटील

राज्यातील 63 जिल्ह्यातील 30 जिल्ह्यांत मी 'बाय रोड' प्रवास केला असून त्यापैकी 17 जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी आज विधानसभेत केलाय. मंत्री चंद्रकात पाटील यांनी राज्यातले रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठीची डेडलाईन आज संपली त्यापार्श्वभूमीवर आज विधानसभेत यासंबंधीचा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला असता त्यांनी ही माहिती दिली.

Chandrakant Funde | Updated On: Dec 15, 2017 05:35 PM IST

महाराष्ट्राच्या 98 टक्के रस्त्यांवरील खड्डे आम्ही बुजवले- चंद्रकांत पाटील

15 डिसेंबर, नागपूर : राज्यातील 63 जिल्ह्यातील 30 जिल्ह्यांत मी 'बाय रोड' प्रवास केला असून त्यापैकी 17 जिल्ह्यातील रस्ते खड्डेमुक्त झाल्याचा दावा सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकात पाटील यांनी आज विधानसभेत केलाय. मंत्री चंद्रकात पाटील यांनी राज्यातले रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठीची डेडलाईन आज संपली त्यापार्श्वभूमीवर आज विधानसभेत यासंबंधीचा प्रश्न विरोधकांनी उपस्थित केला असता त्यांनी ही माहिती दिली.

चंद्रकांत पाटील म्हणाले, "राज्यातील एकूण 23 हजार 381 किमी लांबी रस्त्यावरील 22 हजार 736 रस्त्यांवरील खड्डे भरले आहेत. ग्रामीण भागातील रस्ते खड्डे भरण्याचं काम सुरु आहे. आज दुपारी 3 वाजेपर्यंत 98 टक्के रस्त्यांवरील खड्डे भरण्याचे काम झाले असून, आज मध्यरात्री 100 टक्के खड्डे भरले जातील."

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या टीकेलाही चंद्रकांत पाटलांनी उत्तर दिलं. "मी कधी हेलिकॉप्टर मधून प्रवास केला? हे सुप्रिया ताईंनी दाखवून द्यावं," असं आव्हान त्यांनी यावेळी दिलं. तसेच, "त्या जेव्हा मला यवतमाळला भेटल्या होत्या, तेव्हा माझ्या कामावर समाधान व्यक्त केलं होतं," असंही त्यांनी सांगितलं.

एवढं करूनही जर समजा काही ठिकाणी खड्डे असतील, तर सामान्य लोकांनी ते सरकारला दाखवून द्यावेत. तिथे मी स्वत: खुर्ची टाकून बसेन, आणि खड्डा भरून देईन, असंही चंद्रकांत पाटील यांनी यावेळी स्पष्ट केलं.

दरम्यान, पाटील यांनी खड्डेमुक्तीसाठी दिलेल्या डेडलाईनचा आज शेवटचा दिवस आहे. मात्र, अद्याप राज्यातील रस्त्यांवर मोठमोठे खड्डे असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. सुप्रिया सुळेंनी यावर प्रतिक्रिया देताना, हे सरकार खोटारडं असल्याचा आरोप केला.

Loading...
Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 15, 2017 05:35 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close