'दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?'

महसूलमंत्री चंद्रकांत पाटीलांची राजू शेट्टींच्या दूध प्रश्नावरच्या प्रस्तावित आंदोलनावर खरमरीत टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 7, 2018 08:37 PM IST

'दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का?'

सांगली, ता. ७ जुलै : 16 जुलैपासून मुंबईला दूध जाऊ देणार नाही असे राजू शेट्टी यांनी म्हटले आहे. तर, दूध रोखायला मुंबई काय पाकिस्तानात आहे का? असा प्रश्न विचारत चंद्रकांत पाटील यांनी खासदार राजू शेट्टींना टोला लगावलाय. दूध दराच्या आंदोलनावरून राजू शेट्टी आणि सरकारमध्ये चांगलीच जुंपली आहे. 16 जुलैपासून राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. त्याचबरोबर मुंबईचा दूध पुरवठा बंद केला जाणार आहे.

तर लोकांना वेठीस धरून आंदोलन करून नये. मुंबईला दूध जाऊ देणार नाही असं म्हणता, मुंबईचे नागरिक काय पाकिस्तानचे आहेत का? असा प्रश्न विचारत चंद्रकांत पाटील यांनी खासदार राजू शेट्टींना टोला लगावत, आंदोलनं करायचीच असतील तर रास्तारोको, चक्काजाम, घेराव घालणे अशी करा असा सल्लाही चंद्रकांत दादांनी राजू शेट्टी यांना दिलाय.

दुधाला ५ रूपये प्रतीलीटर भाव मिळत नाही म्हणून येत्या १६ जुलै रोजी राज्यातील सर्व दूध उत्पादक शेतकरी रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहे. तसेच दूध संकलन बंद करून मुंबईला होणारा पुरवठाही बंद करणार असल्याचं स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी यांनी न्यूज18 लोकमतच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितलेय.

आम्ही एकत्रच लढू

सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न राहील. समविचारी पक्ष्यांच्या मतांचे विभाजन होऊ नये असे आम्हाला वाटते. शिवसेना वेगळी लढणार असेल तर लढू दे , आम्ही एकत्रित येण्यासाठी प्रयत्न करत राहणार. काल शिवसेना नेते गजानन कीर्तिकर यांनी  भाजपा उमेदवार विकत घेत असल्याचा आरोप केला होता, त्याला उत्तर देताना महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी " नाचता येईना अंगण वाकडे "

असा टोला लगावला.

टीका करणं हेच विरोधकांचं काम

पावसामुळे विधिमंडळ कामकाज ठप्प प्रकरणी विरोधकांच्या टीकेला उत्तर देताना चंद्रकांत पाटील म्हणाले की, टीका करणे विरोधकांचे कामच असते, काल इलेक्ट्रिक पॅनल पर्यंत पाणी आल्याने वीज पुरवठा बंद केला होता. 3 तासात 168 मि.मी. पाऊस झाला, काल जो पाऊस झाला तेवढा नागपूर मध्ये कधी होत नाही. म्हणून त्यासाठी यंत्रणा तयार नसल्याने हा घोळ झाला, पण एका तासात नंतर वीजपुरवठा पूर्ववत सुरू केला होता.

हेही वाचा...

मुख्यमंत्र्यांसमोर औरंगाबाद महापालिकेनं अशी झाकली लाज

'ती'च्यात वाढ मात्र 'त्या'ची होतेय, पालकांसमोर भावनिक पेच

विद्यार्थ्यांनो 'नीट' लक्ष द्या! आता वर्षातून दोन वेळा होणार परीक्षा

VIDEO : वसईतल्या धबधब्यावर 35 जण अडकले,बचाव कार्य सुरू

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2018 08:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close