News18 Lokmat

रणजित पाटलांनी अधिकाऱ्यावर स्वेच्छा निवृत्तीसाठी दबाव टाकल्याचा आरोप !

अकोल्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप झेडपीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष एस पवार यांनी केलाय.

Chandrakant Funde | News18 Lokmat | Updated On: Feb 14, 2018 06:06 PM IST

रणजित पाटलांनी अधिकाऱ्यावर स्वेच्छा निवृत्तीसाठी दबाव टाकल्याचा आरोप !

14 फेब्रुवारी, मुंबई : अकोल्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांनी स्वेच्छा निवृत्तीसाठी आपल्यावर दबाव टाकल्याचा गंभीर आरोप झेडपीचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष एस पवार यांनी केलाय. अकोल्याचे पालकमंत्री रणजित पाटील यांनी आपल्याला अतिशय उर्मट शब्दात जनता दरबारमध्ये अपमानित केले आणि पाहून घेईल असं म्हटलं. त्यामुळेच आपण दबावात येऊन, शासनाला हे स्वेच्छनिवृत्ती विनंती पत्र पाठवत असल्याचं सुभाष पवार यांनी म्हटलंय. त्यांनी हे पत्र ग्रामविकास आणि जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव यांना लिहिले आहे.

या पत्रात लिहिले की, ' जनता दरबार दरम्यान अकोल्याचे पालकमंत्री डॉ रणजित पाटील यांनी बांधकाम विभाग, जिल्हा परिषद अकोलाशी संबंधित निविदा मंजूर बाबत माझेवर दबाव आणला', तसेच पालकमंत्री महोदयांनी ''मी राज्याचा गृह राज्य मंत्री आहे, तुम्हाला कोणत्या प्रकरणात कसे अडकवायचे ते पाहतो. अशा धमकीचा शब्दात इशारा दिल्याचे पवार यांनी स्वेच्छानिवृत्ती निवृत्तसाठी ग्रामविकास व जलसंधारण विभागाचे प्रधान सचिव यांना लिहिलेल्या पत्रात म्हटलंय. दरम्यान, रणजित पाटलांनी सुभाष पवार यांचे हे सर्व आरोप फेटाळून लावलेत. संबंधित अधिकारी लोकांची कामं करत नसल्यानेच आपण जनता दरबारात त्यांची कानउघडणी केली होती. या रागातून त्यांनी आपल्यावर हे खोटेनाटे आरोप केल्याचं रणजित पाटलांनी म्हटलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Feb 14, 2018 06:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...