केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते अपघातात जखमी

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते अपघातात जखमी

केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या गाडीला खोपोलीजवळ अपघात झालाय. त्यात अनंत गिते किरकोळ जखमी झालेत. त्यांच्या डोक्याला जखम झाल्याने त्यांना तातडीने पालीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय.

  • Share this:

22 डिसेंबर, खोपोली : केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांच्या गाडीला खोपोलीजवळ अपघात झालाय. त्यात अनंत गिते किरकोळ जखमी झालेत. त्यांच्या डोक्याला जखम झाल्याने त्यांना तातडीने पालीच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. गिते यांची प्रकृति आता सुखरूप असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. गिते हे खोपोलीकडून पालीकडे जात होते. त्यावेळी पालीजवळ हा अपघात झाला.

गिते यांच्या वाहनासमोरील पोलिसांच्या पायलट गाडीसमोर दुचाकीस्वार आडवा आला. त्यामुळे पोलिसांच्या गाडीचा अचानक ब्रेक दाबण्यात आला. त्यामुळे मागे असलेली गिते यांच्या गाडीने समोरील पायलट व्हनला धडक दिली. तर गिते यांच्या मागे असलेल्या दुसऱ्या एका पायलट व्हॅनने गिते यांच्या गाडीला धडक दिली. त्यातून हा अपघात झालाय.

First published: December 22, 2017, 2:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading