वेस्टर्न ड्रेस घालून संसद परिसरात गेल्यानं खासदारवर टीका; ट्रोलर्स दिलं हे उत्तर

पश्चिम बंगालमधील तृणमुल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती या वेस्टर्न ड्रेस घालून संसद परिसरात गेल्या. अभिनय क्षेत्रात असलेल्या मिमी आता जादवपूरमधून खासदार म्हणून निवडून आल्या आहेत. त्यांच्यावर टीका झाल्यानंतर त्यांनी ट्रोलर्सना प्रत्युत्तर दिलं आहे.

  • Share this:

संसद परिसरात वेस्टर्न ड्रेस घालून गेल्यानं तृणमुल काँग्रेसच्या खासदार मिमी चक्रवर्ती यांच्यावर नेटकऱ्यांनी निशाणा साधला. त्यानंतर मिमी चक्रवर्ती यांनी मी काम करण्यावर विश्वास ठेवते असं उत्तर दिलं.

मिमी यांनी नुसरत यांना टॅग करत 'और हम फिर से...संसद मे नुसरत जहाँ का पहिला दिन' असं ट्विट केलं. त्यानंतर त्यांना ट्रोल्स करण्यात आलं.

अभिनेत्री असलेल्या मिमी चक्रवर्ती या जादवपूरमधून खासदार म्हणून विजयी झाल्या आहेत.

आपल्या मुलाखती दरम्यान मिमी यांनी आपल्याला लोकांचं खूप प्रेम मिळालं अशी प्रतिक्रिया दिली होती. कपड्यांवरून महिला खासदाराला लक्ष्य केलं जात असेल तर महिला सक्षमीकरणाची गोष्ट बकवास असल्याची प्रतिक्रिया मिमी यांनी दिली होती. लोक समानतेवर बोलतात. पण, त्यांना बदल नको असतो असं मिमी यांनी म्हटलं होतं.

महिलांना  33 टक्के आरक्षण मिळावं यासाठी आम्ही कायम लढा देणार असल्याचं मिमी यांनी म्हटल आहे. तर, तृणमुलनं 41 टक्के महिलांना निवडणुकीत संधी दिल्याची बाब देखील मिमी यांनी अधोरेखित केली.

टीकाकारांकडे लक्ष न देता मिमी यांनी मी कामावर लक्ष केंद्गीत केल्याची प्रतिक्रिया दिली. शिवाय, कोणत्या क्षेत्रातील विकासावर भर द्यायचा याचा विचार देखील पक्का झाल्याची प्रतिक्रिया मिमी चक्रवर्ती यांनी दिली.

मिमी यांना संसद भवन हा चित्रपटाचा सेट नाही अशा शब्दात ट्रोल करण्यात आलं होतं. अनेकांनी तर पश्चिम बंगालची मान खाली जाणार नाही याची काळजी घेण्याचा सल्ला दिला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: May 30, 2019 12:16 PM IST

ताज्या बातम्या