'सेनेसोबत आमचे राजकीय मतभेद असले तरी...' इम्तियाज जलील यांची कंगना प्रकरणात प्रतिक्रिया

'सेनेसोबत आमचे राजकीय मतभेद असले तरी...' इम्तियाज जलील यांची कंगना प्रकरणात प्रतिक्रिया

कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्यामुळे कंगनावर टीकेची झोड उठली आहे. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही कंगनाला सुनावलं आहे.

  • Share this:

मुंबई, 10 सप्टेंबर : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर राज्याच्या राजकारणालाच वळण लागल्याचं पाहायला मिळालं. सध्या कंगना रणौत आणि शिवसेना असा सामना रंगला आहे. आता यामध्ये इतर नेत्यांनीही उडी घेतली आहे. कंगनाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एकेरी भाषेत उल्लेख केल्यामुळे कंगनावर टीकेची झोड उठली आहे. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनीही कंगनाला सुनावलं आहे.

यासंबंधी इम्तियाज जलील यांनी एक ट्वीट केलं आहे. 'आमचे शिवसेनेसोबत राजकीय मतभेद आहेत. पण उद्धव ठाकरे हे माझेही मुख्यमंत्री आहेत. त्यामउळे त्यांचा अनादर तेही टॉम, डिक आणि हॅरी अशा करून हे स्वीकारार्ह नाही. कंगनाने केलेल्या वक्तव्याचा विचार करायला हवा,' असं त्यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.

कोरोना प्रकोपामुळे महाराष्ट्रातील या शहरांना धोका, ग्रामीण भाग बनतोय हॉटस्पॉट

दरम्यान, शिवसेना विरुद्ध कंगना असं Twitter war तर गेले अनेक दिवस सुरू आहेच. कंगनाच्या ताज्या Tweet ने त्यात भर पडली आहे. आता तर उद्धव ठाकरेंचं नाव घेत कंगनाने मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान दिलं आहे.

'मी जगले किंवा मेले तरी तुम्हाला एक्सपोज केल्याशिवाय राहणार नाही', असं म्हणत कंगनाने उद्धव ठाकरे आणि करण जोहर यांचं नाव घेत धमकी दिली आहे. 'करण जोहर आणि उद्धव ठाकरे यांची गँग येऊन आज त्यांनी माझं ऑफिस उद्ध्वस्त केलं. आता घर फोडाल, उद्या माझं तोंड फोडाल आणि माझा जीवही घ्याल. पण जगाला मला दाखवून द्यायचं आहे तुम्ही काय काय केलंय ते!', असं नवं Tweet करत कंगनाने उद्धव ठाकरेंना थेट आव्हान दिलं आहे.

धक्कादायक! तब्बल 8 कोरोना मृतदेह एकाच सरणावर रचले आणि...

मुंबई महापालिकेनं (BMC) कंगना रणौतच्या ऑफिसवर (kangana ranaut office) हातोडा मारल्यानंतर कंगना संतप्त झाली. मुंबई महापालिकेनं (BMC)कंगनाचं ऑफिस अनधिकृत बांधकाम आहे असं म्हणत बुलडोजरने फोडलं. कंगनाने यानंतर आपल्या ऑफिसचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ही लोकशाहीची हत्या असल्याचं कंगना म्हणाली आहे.

कंगनाने एकापाठोपाठ एक ट्वीट करून शिवसेनेवर सडकून टीका केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवरदेखील निशाणा साधला आहे. मुंबई महापालिकेनं आपल्या ऑफिसची काय अवस्था केली हे कंगनाने व्हिडीओ शेअर करत दाखवलं.

Published by: Renuka Dhaybar
First published: September 10, 2020, 8:49 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading