मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

चोरीचा ट्रक विकल्याप्रकरणी एमआयएमच्या नगरसेवकाला अटक

चोरीचा ट्रक विकल्याप्रकरणी एमआयएमच्या नगरसेवकाला अटक

चोरीचा ट्रक चेचिस नंबर बदलून औरंगाबाद मध्ये विकल्या प्रकरणी भिवंडी महानगरपालिकेतील नगरसेवक जफर अख्तर शेख या एमआयएमच्या नगरसेवकाला पोलिसांनी अटक केली आहे.

भिवंडी,ता.06 मे: चोरीचा ट्रक चेचिस नंबर बदलून औरंगाबाद मध्ये विकल्या प्रकरणी भिवंडी महानगरपालिकेतील नगरसेवक जफर अख्तर शेख या एमआयएमच्या नगरसेवकाला पोलिसांनी अटक केली आहे. भिवंडी क्राईम ब्रांच ने ही कारवाई केली आहे.

१५ दिवसांपूर्वी भिवंडी क्राईम ब्रांचने ट्रक आणि ट्रॅक्टर चोरून विकणा-या एका राष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला होता. यावेळी अटक केलेल्या आरोपींच्या चौकशीतून ही माहिती समोर आलीये. चोरीच्या ट्रकचा चेचिस नंबर, इंजिन नंबर बदलून तो ट्रक साडे सहा लाख रुपयांना अख्तर शेख यानं विजापूर येथे विकला.

ते पैसे अख्तर ने त्याच्या बॅंक खात्यावर जमा केले होते. असे प्रकार करणारी टोळी देशपातळीवर असून आत त्यात नगरसेवकच सापडल्याने या टोळीचं जाळं किती मोठं आहे याचा अंदाज येतो.

First published:

Tags: Bhiwandi, Corporator, Crimebranch, Gang, Jafar akhatar shikh, MIM, Police, Theft, Truck, क्राईम ब्रांच, चोरी, जफर अख्तर शेख, ट्रक, नगरसेवक, भिवंडी