मुंबईत कॉलेज तरुणीला दूधवाल्याचा 'नकोसा' स्पर्श, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुंबईत कॉलेज तरुणीला दूधवाल्याचा 'नकोसा' स्पर्श, पोलिसांनी आवळल्या मुसक्या

मुंबईत कॉलेज तरुणीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी दूधविक्रेता असल्याचे समजते. मालाडमधील एसएनडीटी कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. नबी हुसेन शेख (वय-26,रा.कांदिवली) असे आरोपीचे नाव आहे.

  • Share this:

मुंबई, 2 ऑगस्ट- मुंबईत कॉलेज तरुणीची छेड काढल्याप्रकरणी पोलिसांनी एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. आरोपी दूधविक्रेता असल्याचे समजते. मालाडमधील एसएनडीटी कॉलेजजवळ ही घटना घडली आहे. नबी हुसेन शेख (वय-26,रा.कांदिवली) असे आरोपीचे नाव आहे.

नकोसा स्पर्श करुन पळाला होता आरोपी...

मालाडमधील एसएनडीटी कॉलेजजवळ 23 जुलै रोजी ही घटना घडली आहे. पीडित तरुणी कॉलेजबाहेर मैत्रिणीसोबत बोलत उभी होती. त्यावेळी आरोपी तिच्याजवळ आला आणि त्याने तिला नकोसा स्पर्श करुन पळून गेला. नंतर तरुणीने मालाड पोलिस स्टेशनमध्ये त्याच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. ही घटना कॉलेज बाहेरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला होता. पोलिसांनी फुटेजच्या मदतीने घटना घडल्यानंतर 24 तासांच्या आतच आरोपीला गजाआड केले. नबी शेख हा भागातील एका तबेल्यात काम करतो.

आरोपीचे अनेक किळसवाणे प्रकार उघडकीस...

आरोपी नबी शेखने यापूर्वी अनेक तरुणींसोबत असा विकृत आणि किळसवाणा प्रकार केल्याचे पोलिस चौकशीत समोर आले आहे. नबी शेखवर अशा प्रकारचे असे किती गुन्हे दाखल आहेत का, त्याच्या या विकृतपणाला मुली बळी पडल्या आहेत, याबाबत पोलिस तपास करत आहेत. नबी शेखला कोर्टाने पोलिस कोठडी सुनावली आहे.

अंधेरीतील साकिनाका भागात घरावर झाड कोसळले, 1 ठार, 2 जखमी

अंधेरीतील साकिनाका भागात शुक्रवारी दुपारी एका घरावर झाड कोसळून 1 जण ठार झाला असून 2 जण जखमी झाले आहेत. दुसऱ्या एका घटनेत चांदिवलीत म्हाडा कॉलनीतच बिल्डिंग क्रमांक 1 इथे घराची भिंत पडली आहे. या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली 3 जण अडकले होते. घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी अग्निशमन दल, बीएमसी स्टाफ आणि पोलिस दाखल झाले. जवानांनी तिघांना ढिगाऱ्या खालून सुखरुप बाहेर काढल्याची माहिती मिळाली आहे.

अमित शहांचा उदयनराजेंना फोन, संपूर्ण कॉल रेकॉर्डचा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: mumbai
First Published: Aug 2, 2019 06:35 PM IST

ताज्या बातम्या