कोंडी फुटणार, दुधाला मिळणार 25 रूपयांचा दर?

कोंडी फुटणार, दुधाला मिळणार 25 रूपयांचा दर?

सरकारनं संपूर्ण राज्यात दुधाला 25 रूपये दर जाहीर केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 21 तारखेपासून शेतकऱ्यांना हा नवा दर मिळणार असल्याचं समजतंय.

  • Share this:

नागपूर,ता.19 जुलै : गेल्या 4 दिवसांपासून राज्यभर सुरू असलेली दूध कोंडी फुटणार हे जवळपास निश्चित झालंय. कारण सरकारनं संपूर्ण राज्यात दुधाला 25 रूपये दर जाहीर केल्याची माहिती सुत्रांनी दिलीय. 21 तारखेपासून शेतकऱ्यांना हा नवा दर मिळणार असल्याचं समजतंय. गुरूवारी नागपुरात विधानसभा अध्यक्षांच्या दालनात दूध दरवाढीसंदर्भात बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधान परिषद सभापती आणि विरोधी पक्षनेते हजर होते. आतापर्यंत दूधासाठी शेतकऱ्यांना प्रतिलिटर 17 रूपये दर मिळत होता. तर दूध आंदोलनाचं नेतृत्त्व करणाऱ्या राजू शेट्टींनी 5 रूपये अनुदानाची मागणी केली होती. मात्र सरकारनं 5 रूपये अनुदानाऐवजी दरात 8 रूपयांची वाढ केल्याची माहिती समोर येतेय.

सरकारने दूधाला 5 रूपये वाढवून द्यावे आणि दूधावर आयातशुल्क लावावं अशी मागणी विरोधपक्षांनी केली होती. 5 रूपये देणं सध्याच शक्य नाही. सरकार तीन रूपये वाढवून द्यायला तयार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. आयातशुल्काचा विषय हा राज्य सरकारच्या नाही तर केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं. त्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्याची तयारीही सरकारनं दाखवली. मात्र सरकारच्या भूमिकेवर विरोधकांचं समाधान झालं नाही. दूध बंदचा आजचा चवथा दिवस आहे. आंदोलन चिघळलं तर पुणे आणि मुंबईत दूधाचा तुटवडा होऊ निर्माण होऊ शकतो.

हेही वाचा...

अविश्वास प्रस्तावावर राहुल गांधींना घेरण्याचा भाजपचा डाव

आरबीआय लवकरच आणणार शंभराची नवी नोट, कशी असणार जाणून घ्या

धोनीच्या या पाच निर्णयांनी साऱ्यांनाच केले होतं थक्क

बिग बाॅस मराठीत मेघा का वागते आक्रमक?

First published: July 19, 2018, 7:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading