Home /News /news /

स्वार्थी आणि जनमाणसाच्या विरोधातलं हे सरकार; भाजप खासदाराचा हल्लाबोल

स्वार्थी आणि जनमाणसाच्या विरोधातलं हे सरकार; भाजप खासदाराचा हल्लाबोल

खरा शिवसैनिक राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत

अहमदनगर, 1 ऑगस्ट: संपूर्ण राज्यात दूध दरवाढीवरून भाजपने राज्यभरात आंदोलन पुकारलं आहे. ठिकठिकाणी भाजपचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते राज्य सरकारचा निषेध करत आंदोलन करताना दिसत आहे. यातच अहनदनगरमध्ये भाजपचे खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला आहे. राज्यात सत्तेवर असलेलं सरकार हे स्वार्थी आणि जनमाणसाच्या विरोधातलं आहे, अशा शब्दात खासदार सुजय विखे पाटील यांनी हल्लाबोल केला आहे. हेही वाचा...मोठी बातमी! मुंबई महापौर किशोरी पेडणेकर यांच्या थोरल्या भावाचा कोरोनामुळे मृत्यू खासदार सुजय विखे यांनी पारनेर तालुक्यात आमदार मोनिका राजळे यांनी पथर्डीत तर माजी मंत्री राम शिंदे यांनी नगर सोलापूर महामार्गावर आंदोलन केले आंदोलने केली आहे. राष्ट्रीय महामार्गाच्या बाजूला उभे राहून शेतकऱ्यांना मोफत दूध वाटप करून आंदोलन करत महाविकास आघाडीचा निषेध केला . भाजपा महायुतीच्या वतीने राज्यसरकार विरोधात राज्यव्यापी एल्गार आंदोलन राज्यात ठीक ठिकाणी करण्यात आले होते. अहमदनगर जिल्ह्यात दुधाला प्रति लिटर 30 रुपये भाव व 10 रुपये अनुदान, दूध भुकटीसाठी प्रति किलो 50 रुपये अनुदान मिळावे, शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात युरिया खते, बी बियाणे मिळावे, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्यावी, वीज बील माफ करावे आदी मागण्यांसाठी विविध तालुक्यात भाजपने आणि शेतकरी संघटनांनी आंदोलनं केली. हेही वाचा...गोपीचंद पडळकरांनी मोडला देवेंद्र फडणवीसांचा शब्द, सांगलीत घडलं असं काही... राज्य आताच दुधाला भाव मिळत नाही. पुढील काळात महाराष्ट्र पाऊस चांगला आहे. त्यामुळे दूध वाढणार असल्याने अतिशय बिकट अवस्था दूध व्यवसायाची होणार आहे. आघाडी सरकारवर खासदार सुजय विखे यांनी हल्लाबोल केला. हे सरकार जनमाणसाच्या विरोधातली सरकार आहे. स्वार्थासाठी एकत्र आले आहे, आजही खरा शिवसैनिक राम मंदिराच्या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचं यावेळी खासदार सुजय विखे पाटील यांनी दावा केला आहे.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: BJP, Sujay Vikhe Patil

पुढील बातम्या