मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

'...नाहीतर मुख्यमंत्र्यांना 'मातोश्री'वर जाऊन दुग्धाभिषेक घालू'

'...नाहीतर मुख्यमंत्र्यांना 'मातोश्री'वर जाऊन दुग्धाभिषेक घालू'

बीडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून अनोखे आंदोलन करण्यात आले.

बीडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून अनोखे आंदोलन करण्यात आले.

बीडमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून अनोखे आंदोलन करण्यात आले.

बीड, 20 जुलै : दुधाला योग्य भाव मिळावा म्हणून राज्यभरात आंदोलन सुरू आहे. बीडमध्ये  दूध आंदोलक आक्रमक झाले असून दुधाला भाव वाढ द्या अन्यथा मुख्यमंत्र्यांना 'मातोश्री'वर जाऊन दुग्धाभिषेक घालू' असा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिला आहे.

बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी गावात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या युवती प्रदेशाध्यक्ष पूजा मोरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक घालून अनोखे आंदोलन करण्यात आले.

दुधाला 10 रुपये प्रति लिटर अनुदान द्या अशी मागणी या संघटनेनं केली.  मागण्या मान्य न झाल्यास 'मातोश्री'वर जाऊन मुख्यमंत्र्यांना दुग्धाभिषेक घालू, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्या पूजा मोरे यांनी दिला.

ठाकरे सरकारला पाडण्याचा दिवस ठरला, भाजपने आखला मोठा प्लॅन?

दरम्यान, दूध दरवाढी संदर्भात आज राज्यात ठिकठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने आंदोलन करण्यात येत आहे. सातारा जिल्ह्यातील कराडजवळच्या वाठार इथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दूध टँकर अडवून टँकर चालकाला दुधाचा अभिषेक घालून निषेध नोंदविला आहे. अचानक झालेल्या या घटनेनं एकच धावपळ उडाली. कराड पोलिसांनी या आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. आज सातारा जिल्ह्यात या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी मुंबई बंगलोर महामार्गावर पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.

दौंडमध्ये कार्यकर्त्याला दुग्ध अभिषेक

सरकारने वाढीव दूध दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचं दौंड तालुक्यातील देवळगाव याठिकाणी अनोखे आंदोलन करण्यात आले स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्याला दुग्ध अभिषेक घालून सरकारच्या विरोधात घोषणा देत आंदोलन करण्यात आले. दूध उत्पादक शेतकऱ्यांना बाजार मिळाला पाहिजे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आता आक्रमक पवित्रा घेतलेला पाहिला मिळत आहे.

बुलडाण्यात बैलाला घातली आंघोळ

बुलडाणा जिल्ह्यात स्वाभिमानीचे प्रशांत डिक्कर यांनी चक्क बैलांना दुधाची आंघोळ घालून आंदोलन केले आहे. सरकारने दुधाला प्रति लिटर 10 रुपये अनुदान द्यावे, दूध पावडरला प्रति किलोला 50 रुपये अनुदान द्यावे आणि तुप, दूध पावडर, व बटर यावरील जीएसटी कमी करावा अशी मागणी या आंदोलनातून करण्यात आली आहे.

हायवेवर गाडी चालवत असताना अचानक समोर आलं हरिण, हद्याचे ठोके वाढवणारा VIDEO

सरकारने राजू शेट्टी यांच्या दूध बंद आंदोलनाची दखल न घेतल्यास देशाला लागणारे अन्न धान्य बंद करावे लागेल असा इशारा या आंदोलनातून सरकारला देण्यात आला आहे.

राजारामबापू दुध संघाचा एक टँकर फोडला

दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे आज दूध आंदोलन पेटले आहे. पहाटे पुणे बंगळुरू हायवे वर दुधाचा टँकर फोडला तर कसबे डिग्रजहुन मुंबईकडे चाललेला राजारामबापू दूध संघाचा टँकरही स्वाभिमानाच्या कार्यकर्त्यांनी फोडला आहे. दुधाला योग्य असा भाव मिळावा यासाठी हे आंदोलन आजपासून सुरू झाले आहे. विशेष म्हणजे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये या आंदोलनाची ठिणगी मोठ्या प्रमाणात पाहण्यास मिळत आहे.

जालन्यात मोफत दूध वाटून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अनोखे आंदोलन

तर, पुढील तीन महिन्यासाठी राज्य सरकारने थेट शेतकर्‍यांच्या खात्यावर प्रतिलिटर 5 रूपये अनुदान जमा करावे यासह विविध मागण्यांसाठी जालन्यात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मोफत दूध वाटप करून अनोखं आंदोलन करण्यात येत आहे.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुरेश काळे यांच्या नेतृत्वाखाली हा दूध आंदोलन पार पडले. शेतकर्‍यांनी एक दिवस दूध संकलन करू नये, या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आवाहनाला जालन्यात चांगलाच प्रतिसाद मिळत आहे. शेतकऱ्यांनी दूध संकलन न करता सोशल डिस्टन्स पाळून भरपावसात आंदोलनात नोंदवला सहभाग नोंदवित मोफत दूध वाटप केलं.

माळशिरसमध्ये दुधाची वाहतूक रोखली

माळशिरस तालुक्यात दररोज 4 लाख 50 हजार लिटर दूधाचे उत्पादन होते. दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आंदोलन पुकारले आहे. या पार्श्वभूमीवर आज पहाटे माळशिरस तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी अकलूज- इंदापूर रोडवर टायर पेटवून पुणे आणि मुंबई कडे जाणारी दूध वाहतूक रोखली आहे.

First published: