दुध 'उकळलं', राज्यभरात दूध आंदोलनाला हिंसक वळण

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दुध आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2018 07:36 AM IST

दुध 'उकळलं', राज्यभरात दूध आंदोलनाला हिंसक वळण

मुंबई, 17 जुलै : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी पुकारलेल्या दुध आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. चांद्यापासून बांद्यापर्यंत या दूध आंदोलनाचं लोण सध्या पहायला मिळतंय. मुंबईला होणारा दूध पुरवठा तोडण्याचा प्रयत्न आंदोलकांकडून सुरू आहे.

राज्यभरातून मुंबईत येणारे दूधाचे टँकर आंदोलकांनी रोखून धरलेत. या आधीच दुध आंदोलनावरून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यात चांगलीच जुंपलीय. त्यामुळे हा मुद्दा अधिवेशनातही चांगलाच गाजण्याची शक्यता आहे.

मनुस्मृतीचा अभ्यास करून आंबेडकरांनी राज्यघटना लिहिली-संभाजी भिडे

मुंबईत आणखी तीन दिवस पुरेल इतका दुधाचा साठा आहे. त्यामुळं तातडीनं नसलं तरी आणखी दोन दिवसांपासून दुधाचा तुटवडा निर्माण होऊ शकेल. त्यामुळं मुंबईकरांना दूध टंचाईला सामोरं जावं लागू शकते.

दूध आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे. पुण्यात दुध आंदोलनाला हिंसक वळण प्राप्त झालंय. पहाटे पुण्यामध्ये आंदोलनकर्त्यांनी गोकुळ दुधाच्या गाडीवर दगडफेक केलीय. तर दुसरीकडे पिंपरीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत अमूल दुधाचा ट्रक आढवला. त्यानंतर दुधाच्या पिशव्या रस्त्यावर फेकत जोरदार घोषणाबाजी केलीय.

Loading...

आंबा खाल्याने पुत्रप्राप्ती होतेच हे कोर्टात सिद्ध करेन-संभाजी भिडे

कोल्हापूरात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत शिरोळ तहसीलदारांच्या गाडीवर दूध ओतलं. शिरोळ तालुक्यातील दुध आंदोलनासंदर्भात आढावा घेत असताना तहसीलदारांच्या गाडीवर हे दुध ओतण्यात आलं. यावेळी कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली.

हेही वाचा...

लज्जास्पद, भारताच्या सुवर्णकन्येची 'गुगल'वर शोधली गेली ‘जात’

VIDEO : रुग्नवाहिका मिळाली नाही,भरपावसात पार्थिव रिक्षाच्या टपावरून ठेवून नेले

चंद्रकांत पाटलांच्या बोलण्याने का होतात वाद? ही आहेत त्यांची वादग्रस्त वक्तव्य

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2018 07:30 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...