किती हे धाडस म्हणायचं! दुधाचा लेबल लावून आणला टेम्पो, आणि...

किती हे धाडस म्हणायचं! दुधाचा लेबल लावून आणला टेम्पो, आणि...

लॉकडाउन असल्यामुळे मांजरी खुर्द येथील पुलावर लोणीकंद पोलिसांच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली होती.

  • Share this:

रायचंद शिंदे, प्रतिनिधी

पुणे,13 एप्रिल : अत्यावश्यक सेवेच्या दूध वाहतुकीचे लेबल लावून गावठी दारूची वाहतूक करणारा टेम्पो लोणीकंद पोलिसांच्या नाकाबंदीमध्ये मांजरी खुर्द येथील पुलावर पकडण्यात आला. टेम्पोमध्ये गावठी दारूचे 36 मोकळे व 1 भरलेले असे एकूण 37 कॅन सापडले आहेत. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी टेम्पो जप्त करून कारवाई केली आहे.

याबाबतीत मिळालेल्या माहितीनुसार, लॉकडाउन असल्यामुळे मांजरी खुर्द येथील पुलावर लोणीकंद पोलिसांच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली होती. नाका बंदीमध्ये पोलीस कर्मचारी प्रफुल्ल सुतार, पोलीस मित्र कल्पेश थोरात, समीर उंद्रे, शिवाजी हजारे, पत्रकार नाथाभाऊ उंद्रे, अशोक आव्हाळे आणि तरुण हे येणाऱ्या गाड्यांची कसून चौकशी करीत होते.

हेही वाचा - अमेरिकेतून भारतात येतोय कोरोना? न्यूयॉर्कमध्ये मृतांचा आकडा झाला कमी पण...

मांजरी बुद्रुक येथून मांजरी खुर्दच्या दिशेने येत आलेल्या एका टेम्पोवर दूध वाहतुकीचा लेबल लावलेले दिसले. टेम्पो अडवून तपासणी केली असता आतमध्ये गावठी दारूचे 36 मोकळे तर 1 भरलेले कॅन दिसले. टेम्पोला दुधाच्या वाहतुकीचे लेबल लावून गावठी दारूची वाहतूक केली जात असल्याचा प्रकार समोर आला. तात्काळ टेम्पो पोलिसांनी जप्त केला असून चालकावर कारवाई केली आहे.

कात्रज येथून आला होता टेम्पो

दुधाच्या नावाखाली गावठी दारूची वाहतूक करणारा टेम्पो कात्रज येथून आला होता. पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात पोलिसांचा बंदोबस्त असताना एकाही चेकनाक्यावर शहर पोलिसांनी टेम्पो तपासला कसा नाही. दुधाच्या नावाखाली गावठी दारूची वाहतूक करण्यासाठी टेम्पो चालकाचे धाडस कसे झाले? असा सवाल यानिमित्ताने विचारला जात आहे.

हेही वाचा - पोलीस चौकीवर RSS कार्यकर्ते तैनात? व्हायरल झालेल्या फोटोवरून वाद चिघळला

संपादन - सचिन साळवे

First published: April 13, 2020, 10:35 AM IST

ताज्या बातम्या