शहिदांना धार्मिक रंग देण्यावरून लष्कराने ओवैसींना फटकारलं

शहिदांना धार्मिक रंग देण्यावरून लष्कराने ओवैसींना फटकारलं

जम्मू काश्मीर मधील शहिदांना धर्माचा रंग देऊ पाहणाऱ्या असदुद्दीन ओवैसी यांना लष्कराने चांगलंच फटकारलंय.

  • Share this:

14 फेब्रुवारी, नवी दिल्ली : जम्मू काश्मीर मधील शहिदांना धर्माचा रंग देऊ पाहणाऱ्या असदुद्दीन ओवैसी यांना लष्कराने चांगलंच फटकारलंय. शहिदांना कोणताही धर्म नसतो, त्यामुळे जवानांच्या बलिदानाला विनाकारण कोणी धर्माचा रंग देण्याचा प्रयत्न करू नये, आणि ज्यांनी कोणी शहिदांच्या धर्मावर भाष्य केलंय, त्यांना सैन्याची पुरेशी माहिती नसावी, अशा शब्दात भारतीय लष्कराच्या उत्तर कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल देवराज अंबू यांनी ओवैसींना फटकारलंय.

जम्मू- काश्मीरमधील संजवानच्या लष्करी तळावर दहशवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात 3 मुस्लीम जवान शहीद झाले होते. त्यावर आता मुस्लिमांच्या देशभक्तीवर शंका घेणारे कुठे आहेत, असा सवाल ओवेसी यांनी विचारला होता. मुसलमानांच्या प्रामाणिकपणावर शंका घेणाऱ्यांनी आणि त्यांना पाकिस्तानी म्हणणाऱ्यांनी यावरून धडा घ्यायला हवा. आम्हीही देशासाठी जीव देत आहोत, असे ओवेसींनी म्हटले होते. त्यावर सैन्याच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही प्रतिक्रिया दिली.

दहशतवाद वाढण्यासाठी सोशल मीडिया देखील कारणीभूत ठरत आहे. सोशल मीडियामुळे दहशतवादी संघटनांना तरुणांपर्यंत पोहचणे शक्य होतंय. याबद्दलही लष्कराने चिंता व्यक्त केलीय.

 

First published: February 14, 2018, 3:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading