• Home
  • »
  • News
  • »
  • news
  • »
  • बाबा रहीमच्या डेऱ्यात लष्कर घुसलं !

बाबा रहीमच्या डेऱ्यात लष्कर घुसलं !

हरियाणातली तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात येताच लष्कर आता थेट बाबा रहीमच्या डेऱ्यात घुसलंय. लष्कराने बाबा रहीमच्या आश्रमावर आता पूर्ण ताबा मिळवला असून तो पूर्णपणे रिकामा केलाय.

  • Share this:
सिरसा, 26 ऑगस्ट : हरियाणातली तणावग्रस्त परिस्थिती नियंत्रणात येताच लष्कर आता थेट बाबा रहीमच्या डेऱ्यात घुसलंय. लष्कराने बाबा रहीमच्या आश्रमावर आता पूर्ण ताबा मिळवला असून तो पूर्णपणे रिकामा केलाय. बाबांच्या समर्थकांनाही लष्कराने इथून बाहेर काढलंय. बाबाच्या समर्थकांनी पुन्हा हिंसाचार घडवू नये, यासाठी लष्कराने हे पाऊल उचललं आहे. दरम्यान, लष्कराच्या या धडक कारवाईच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यात एक उच्चस्तरीय बैठक पार प पडलीय. केंद्रीय गुप्तचर विभागाचे अधिकारीही त्याला उपस्थित होते. या बैठकीत हरियाणातील तणावग्रस्त परिस्थितीचा आढावा घेण्यात आला. कालच्या हिंसाचारानंतर पंचकुलासह रहियाणातली परिस्थिती आता पूर्णपणे नियंत्रणात आहे. खट्टर सरकारने कालची परिस्थिती हाताळण्यात पूर्णपणे निष्काळजीपणा दाखवल्याने आता सर्व सूत्र केंद्रातूनच हलवण्यात येत आहेत. बाबा रहीमच्या आश्रमावरील लष्कराची ही धडक कारवाई देखील त्याचाच एक भाग मानला जातोय.
First published: