मुंबई, 13 मे- मातृदिनाच्या दिवशी अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींनी आपल्या आईसोबतचे लहानपणापासून ते आतापर्यंतचे अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केले. पण याला अपवाद निघाला आर्यन मॅन मिलिंद सोमण. फिटनेसचा 'ब्रँड अँबेसिडर' मिलिंदने त्याच्या आईसोबत फिटनेस गोल देताना दिसला. मिलिंदने काल एक व्हिडिओ शेअर केला यात तो म्हणाला की, आज माझ्या आईने मला पुशअप करण्याचं आव्हान दिलं आहे. ती नेहमीच मला आव्हान देत असते. आता मीही तिला एक आव्हान दिलं आहे. यानंतर मिलिंद आणि त्याची आई उशा सोमण हे एकत्र पुशअप्स करताना दिसतात. ८० वर्षांच्या उशा यांना सराईतपणे पुशअप्स करताना पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
सनी लिओनीने 'या' एका अटीवर साइन केलेले सहा पॉर्न सिनेमे
या व्हिडिओनंतर मिलिंदने लिहिले की, ‘सगळ्यांकडे लक्ष देताना आई स्वतःकडे दुर्लक्ष करते. या मातृदिनाच्या दिवशी आपल्या आईला तिच्या फिटनेससाठी जागरुक करा आणि स्वतःसाठी वेळ काढायला सांगा.’ व्हिडिओमध्ये मिलिंद म्हणतो की, ‘हा व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक आईला मी सांगू इच्छितो की, दररोज स्वतःसाठी थोडा वेळ काढा. मग तो पाच मिनिटं किंवा १० मिनिटं काढला तरी चालेल. काही झालं तरी स्वतःला वेळ द्या. आम्हा सगळ्यांनाच तुम्हाला सुपरफिट पाहायचं आहे. मातृदिनाच्या शुभेच्छा.’
Kabir Singh Trailer- 'तेरे लिए कुछ भी कर सकता हूं... तेरे में मेरे जैसा पागलपन है तो...'
मिलिंदच्या या व्हिडिओला हजारो लाइक्स आणि शेअर मिळाले असून अनेकांनी कमेंटमध्ये मिलिंद आणि त्याची आई उशा यांचं भरभरून कौतुक केलं आहे. देविका नावाच्या एका इन्स्टाग्राम युझरने लिहिले की, ‘तुम्ही आणि तुमची आई फार सशक्त आहात. तुम्ही सर्वांसाठी प्रेरणादायी आहात.’ तर रवी हरिरानीने उत्कृष्ट, अविश्वसनीय असं म्हटलं.
VIDEO: केरळमध्ये पौर्णिमेची धमाल, हत्तीच्या सोंडेनं उघडलं दक्षिणेचं दार