राज्यात पुराचा महाप्रलय! 204 गावांतून 51 हजार 785 नागरिकांचं स्थलांतर

राज्यात पुराचा महाप्रलय! 204 गावांतून 51 हजार 785 नागरिकांचं स्थलांतर

आज सकाळपासूनच एनडीआरएफ आणि लष्करांनी बोटीद्वारे पूरग्रस्तांना मदत देण्यास सुरुवात केली आहे. अखेर जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.

  • Share this:

कोल्हापूर, 07 ऑगस्ट : अनेक जिल्ह्यांतील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आज सकाळी नौसेनेच्या 2 विमानातून एका बोटीसह 22 जणांचं पथक तसंच गोवा कोस्टगार्डचं एक हेलिकॉप्टर बोटीसह दाखल झालं आहे. आज सकाळपासूनच एनडीआरएफ आणि लष्करांनी बोटीद्वारे पूरग्रस्तांना मदत देण्यास सुरुवात केली आहे. अखेर जिल्ह्यातील 204 गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली. गेल्या 4 दिवासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे कोल्हापूर, नाशिक, सांगली, पुणे, रत्नागिरी अशा अनेक शहरांत पुरपरिस्थिती निर्माण झाली आहे.

मंगळवारी रात्री लष्कराचे एक पथक दोन बोटींसह तसेच एनडीआरएफचे आणखी एक पथक चार बोटींसह शहरात दाखल झालं होतं. परंतू, महामार्गावर आलेल्या पाण्यामुळे अडचण निर्माण झाली. बुधवारी पहाटेपासूनच प्रयाग चिखलीकडे चार बोटींसह पथक रवाना झालं आहे. शहरासाठी दोन बोटींमधून मदत देण्यास सुरुवात झाली. सकाळी नौसेनेच्या दोन विमानांमधून एका बोटीसह 22 जणांचे पथक शहरात दाखल झालं. त्याचबरोबर गोवा कोस्टगार्डचे एक हेलिकॉप्टर एका बोटीसह दाखल झालं आहे.

पाण्यामध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आणखी बोटींची गरज असल्यामुळे नौसेनेने बुधवारी पुन्हा 14 बोटी देण्याचं मान्य केलं आहे. प्राधान्याने प्रयाग-चिखलीकडे मदत पाठवली असून आवश्यक त्या ठिकाणी हेलिकॉप्टरच्या माध्यमातून एअरलिफ्टींग सुरू करण्यात येणार आहे.

जिल्ह्यामध्ये पूर्णत:, अंशत:, पूरबाधीत अशा 204 गावांचा समावेश आहे. मंगळवारी अखेर या गावांमधून 11 हजार 432 कुटुंबांमधील 51 हजार 785 व्यक्तींना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. आवश्यकतेनुसार, पूरग्रस्तांना जीवनाश्यक वस्तू विशेषत: अन्नाची पाकीटं देण्यात येणार आहेत. प्रशासन पूर्णपणे सतर्क आणि सज्ज आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये असं आवाहनही जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी केले आहे.

इतर बातम्या - महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा रेड अलर्ट, धरणं ओव्हरफ्लो झाल्यामुळे महापुराचा धोका

ठाणे, रायगड, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा

गेल्या 4 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण राज्यात पाण्याचा हाहाकार सुरू आहे. कोकणासह कोल्हापूर, नाशिक, सांगली, पुणे, औरंगाबादमध्ये पावसाचं रौद्र रुप पाहायला मिळालं आहे. अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे. पाण्यात अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी आता एनडीआरएफची टीम अनेक गावांमध्ये दाखल झाले आहे. अशात ठाणे, रायगड, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रेदश, विदर्भ, मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर पुढच्या काही दिवस कायम असेल असा अंदाज भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अनेक महत्त्वाच्या शहरांमध्ये मान्सून अधिक सक्रिय होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. तर अनेक गावांना आणि शहरांना सतर्कतेचा उशारा देण्यात आला आहे.

पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र, कोकण, कर्नाटकच्या किनारी भागात, राजस्थान, गुजरातमध्ये मुसळधार पाऊस होईल असं हवामान खात्यानं म्हटलं आहे. रायगड, पालघरला मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला असला तरी मुंबईत पावसाच्या हलक्या सरी बरसतील असं हवामान खात्याने म्हटलं आहे. गेल्या 24 तासांमध्ये कोकण, गोवा, दक्षिण-मध्य महाराष्ट्र, कर्नाटकमध्ये मुसळधार पावसाने थैमान खातलं आहे.

इतर बातम्या - सुषमा स्वराज यांच्या निधनावर व्हायरल झाला हा VIDEO, लोक म्हणाले...

कोकण आणि गोव्यामध्ये मुसळधार पावसाची शक्यता...

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे कोकण आणि गोव्यामध्ये बुधवारी मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. तर पुढच्या काही दिवस पावसाचा जोर कायम राहील असंही हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

VIDEO: पुरामुळे प्राण्यांचा जीव धोक्यात, पाहा बैलाचं LIVE रेस्क्यू ऑपरेशन

Published by: Renuka Dhaybar
First published: August 7, 2019, 11:48 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading