Home /News /news /

मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला म्हणतात, भारताची सदयपरिस्थिती ही दु:खद

मायक्रोसॉफ्टचे CEO सत्या नडेला म्हणतात, भारताची सदयपरिस्थिती ही दु:खद

मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO सत्या नडेला यांनी नागरिकत्व सुधारणा कायद्याबाबत नकारात्मक मत व्यक्त केलं आहे

    नवी दिल्ली, 14 जानेवारी:  नागरिकत्व सुधारणा कायद्याविरोधात देशभरात आंदोलन सुरू असताना आता मायक्रोसॉफ्ट कंपनीचे CEO सत्या नडेला यांनीदेखील या कायद्याबाबत नकारात्मक मत व्यक्त केलं आहे. मॅनहॅटनमधील एका कार्यक्रमात ‘बझफीड’चे संपादक बेन स्मिथ यांच्याशी बोलताना भारतीय वंशाचे सत्या नडेला म्हणाले, की सध्या भारतात जे सुरू आहे, ते अत्यंत दु:खद आहे. जर बांगलादेशातील एखादा निर्वासित भारतातील इन्फोसिसचा CEO झाला तर मला आवडेल. देशाची सुरक्षा हे आपले प्राथमिक ध्येय आहे. यासाठी प्रत्येकाने आपल्या सीमा ठरविणे आवश्यक असते. स्थलांतर ही अनेक देशांमधील समस्या आहे. मात्र स्थलांतरित कोण आहे, अल्पसंख्याक समूह कोणता? हे कशाच्या आधारावर ठरविलं जातं, हे महत्त्वाचं असल्याचं नडेला यांच्यावतीने मायक्रोसॉफ्ट इंडियाद्वारा दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे. सत्या नडेला एका जागतिक कंपनीचे CEO आहेत. याचे श्रेय भारतातील तंत्रज्ञानाच्या प्रसाराला आणि अमेरिकेच्या इमीग्रेशन पॉलिसीला जात असल्याचे नडेला यांनी स्पष्ट केले. १० जानेवारी रोजी नागरिकत्व सुधारणा कायदा देशभरात लागू करण्यात आला आहे. मात्र अद्यापही नागरिकत्व सुधारणा कायद्यावरुन देशभरात आंदोलन सुरू आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Immigration Bill, Microsoft

    पुढील बातम्या