आसाम, 19 जून : जगात पैसा कुणाला नको असतो बरं...पण प्राण्यांना काय त्याचं...म्हणून घरात उच्छाद मांडणाऱ्या उंदरांनी थोडी थोडकी नव्हे तर तब्बल 12 लाख रुपये कुरतडल्याची घटना आसाममध्ये घडली. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या उंदरांनी एटीएममधील हे पैसे फस्त केले.
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर एका एटीएममधील उंदरांनी कुरताडलेल्या नोटांचा खच्च असलेले फोटो व्हायरल झाले. हे एटीएम आसाममधील तिनसुकिया जिल्ह्यातील स्टेट बँक आॅफ इंडियाचं एटीएम आहे.
क्रांतिकारी संशोधन! 'गुगल' सांगणार आता पेशंटच्या मृत्यूची तारिख!
मिळालेल्या माहितीनुसार, तिनसुकिया जिल्ह्यातील लैपुली भागात हे एटीएम आहे. या एटीएममध्ये 20 मे रोजी तांत्रिक बिघाड झाला होता. त्यानंतर 11 जून रोजी जेव्हा कर्मचारी तिथे पोहोचले आणि एटीएम मशीन उघडून पाहिलं तेव्हा त्यांना एकच हादरा बसला. 2000 हजार आणि 500 रुपयांच्या नोटांचा चुराडा पाहण्यास मिळाला. या नोटांचा चुराडा उंदरांनी केला होता. उंदरांच्या या पराक्रमामुळे 12.38 लाख रुपये वाया गेले.
नाशिकच्या एटीएममधून निघाले पाच पट पैसे, 5 तासात काढले 2 लाख 68 हजार
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, या एटीएमची देखरेख ठेवण्याची जबाबदारी ग्लोबल बिझनेस सल्युशन्सला देण्यात आली होती. या कंपनीने एटीएम खराब होण्याच्या एक दिवस आधी 19 मे रोजी एटीएम मशीनमध्ये 29 लाख जमा केले होते. एसबीआयच्या अधिकाऱ्यांनी या एटीएममधून 17 लाख रुपये सुरक्षित काढू शकली. अधिकाऱ्यांनी या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार दाखल केलीये.
परंतु, एटीएममधील बिघाडावरून संशय निर्माण झालाय. प्रांजल शर्मा नावाच्या तरुणाने, एक एटीएम 21 दिवस बंद कसं राहु शकतं. गेल्या 21 दिवसात तांत्रिक बिघाड कर्मचाऱ्यांच्या लक्ष्यात आला नाही का ?, 12 लाखांचा चुराडा होऊन एसबीआयचे कर्मचारी अशीच सेवा करत आहेत का? असे प्रश्न प्रांजल शर्माने उपस्थितीत केले आहे.