घर शोधणाऱ्यांसाठी खूशखबर! म्हाडाची राज्यात 11 हजार घरांची लॉटरी

घर शोधणाऱ्यांसाठी खूशखबर! म्हाडाची राज्यात 11 हजार घरांची लॉटरी

महाराष्ट्रात लवकरच 11 हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार

  • Share this:

मुंबई, 01 मार्च : यंदा म्हाडाच्या घरांच्या किंमती कमी होणार असून महाराष्ट्रात लवकरच 11 हजार घरांची लॉटरी काढण्यात येणार असल्याचं जाहीर करण्यात आलं आहे. म्हाडाचे अध्यक्ष उदय सामंत यांनी विरार-बोळींज येथील घरांच्या किंमती कमी करणार असल्याची घोषणा केली आहे.

राज्यात म्हाडाच्या सर्व वसाहती, संकुल, संस्था यासाठी दर 30 वर्षांनी भूखंड करारनामा करण्यात येतो. यापुढे करारनाम्याची प्रक्रिया संपुष्टात आणण्याचा निर्णया गुरुवारी म्हाडा प्राधिकारणाने घेतला आहे. या निर्णयावर पुढच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात येईल असं म्हाडा अध्यक्ष उदय सामंत यांनी सांगितले. यावेळा मुंबई मंडळाचे सभापती मधू चव्हाण, मुंबई इमारत दुरुस्ती आणि पुनर्रचना मंडळाचे सभापती विनोद घोसाळकर, कोकण मंडळाचे सभापती बाळासाहेब पाटील आदी उपस्थित होते.

विरार बोळींज मधील घरांच्या किंमती कमी होणार असून त्यांचा दर 200 रुपये प्रति चौरस फूट इतका असणार आहे. यामुळे अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांना एक लाख रुपयांपर्यंत फायदा होणार आहे. विरारमधील 9 हजार 400 घरांच्या किंमती अल्प ते उच्च उत्पन्न गटासाठी सव्वा ते सव्वा दोन लाखांपर्यंत कमी करण्यात येतील. याचा म्हाडाला कोणतंही नुकसान होणार नसल्याचं सामंत यांनी सांगितले.

गेल्या अनेक वर्षांपासून सीआरझेडमुळे अनेक बांधकामे रखडली आहेत. सीआरझेड कायद्यामुळे 50 मीटर परिसराच्या नियमामुळे रखडलेल्या बांधकामांना मान्यता देण्याचा निर्णय म्हाडाने घेतला असल्याचं मधू चव्हाण यांनी सांगितले. यामुळे भागातील रहिवाशांना दिलासा मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आढावा घेतल्यानंतर अंमलबजावणी करण्यात येणार असल्याचं त्यांनी सांगितलं.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2019 04:13 PM IST

ताज्या बातम्या